Uncategorizedताज्या घडामोडीपुणे

Maha Aarti: मनसे ठाम; आज कसबा पेठेतील पुण्यश्वर मंदिरात महाआरती करणारच!

पुणे: आज, ४ एप्रिल रोजी पुण्यातील कसबा पेठ येथील पुण्यश्वर मंदिरात  मनसेकडून महाआरती करण्यात येणार आहे. काल ३ मे रोजी रमजान ईद असल्याने राज ठाकरेंच्या औरंगाबाद सभेनंतर स्थानिक पातळीवर महाआरतीचा निर्णय स्थगित करण्यात आला होता. मनसे आणि हिंदुत्ववादी संघटना अक्षयतृतीयाच्या मुहूर्तावर प्रत्येक शाखेमध्ये महाआरती करणार होते. पण ईद असल्यामुळे राज ठाकरे यांनी ४ तारखेपर्यंत भोंगे उतवरण्याचे अल्टीमेटम दिले आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवर मसने कार्यकर्त्यांनी ४ तारखेला महाआरती करण्याचा निर्णय घेतला

राज ठाकरे यांनी औरंगाबाद येथील सभेत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. तसेच सभेत घातलेल्या अटींचं उल्लंघन झाले आहे. याप्रकरणी मनसेचे राज ठाकरे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल झाला झाला आहे. एकीकडे मनसेने मशिदींवरील भोंग्यांविरोधात उद्या राज्यभरात आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे, तर दुसरीकडे पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाईला सुरुवात केली आहे. मुंबईत पोलिसांनी मनसे नेते महेश भानुशाली यांना घाटकोपरमधून अटक केली आहे. तर राज्यभरात पोलिसांनी मनसेच्या कार्यकर्त्यांना नोटीस बजावण्यास सुरवात केली आहे. अशात आता मनसेने उद्या महाआरती करण्याचा निर्णय घेतला आहे.

मनसेने घेतलेल्या निर्णयानुसार, आज सकाळी ११ वाजता पुण्यातील कसबा पेठ येथील पुण्यश्वर मंदिरात मनसेकडून महाआरती करण्यात येणार आहे. दुसरीकडे राज ठाकरेंनी ४ तारखेपर्यंत भोंगे उतवरण्याचे अल्टीमेटम दिल्याने पोलिसांनी पुण्यात शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांच्यासह ७०० ते ८०० कार्यकर्त्यांना नोटीस दिल्या आहेत. मनसेचे राज्य सरचिटणीस अजय शिंदे यांनी याबाबत माहिती दिली असून उद्या महाआरती करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. आता पुण्यश्वर मंदिरासमोर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button