breaking-newsTOP Newsक्रिडाताज्या घडामोडी

IND vs AUS Final : वर्ल्डकप फायनलच्या दिवशी कोण-कोणते कार्यक्रम होणार? वाचा..

World Cup 2023 Final : एकदिवसीय विश्वचषक २०२३चा अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात खेळला जाणार आहे. हा सामना उद्या (१९ नोव्हेंबर) अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. या अंतिम सामन्यासाठी बीसीसीआयने पंतप्रधान मोदी आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांना निमंत्रण पाठवले आहे. यासह बीसीसीआयने फायनलच्या दिवशी कोण-कोणते कार्यक्रम होणार हे सांगितलं आहे.

बीसीसीआयने दिलेल्या माहितीनुसार, विश्वचषकातील अंतिम सामन्यापूर्वी भारतीय वायुसेनेचा एरोबॅटिक संघ सूर्य किरणचा एअर शो करेल. तसेच नाणेफेक झाल्यानंतर लगेचच दुपारी १.३५ वाजता कार्यक्रम सुरू होईल. एअर शो १५ मिनिटे चालेल आणि दुपारी १.५० वाजता संपेल. यानंतर दोन्ही संघांचे राष्ट्रगीत होईल आणि त्यानंतर सामना सुरू होईल.

हेही वाचा – बागेश्वर धामचे पीठाधीश्वर धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या पुण्यातील कार्यक्रमाला अनिसचा विरोध

सामन्यादरम्यान पहिल्या डावात ड्रिंक्स ब्रेक दरम्यान गायक आदित्य गढवी परफॉर्म करणार आहे. यानंतर सामन्याचा पहिला डाव संपल्यानंतर प्रसिद्ध संगीतकार प्रीतम चक्रवर्ती यांचा कार्यक्रम होणार आहे. त्यांच्याशिवाय प्रसिद्ध गायिका जोनिता गांधी, नकाश अजीज, अमित मिश्रा, आकाश सिंग आणि तुषार जोशी हे देखील परफॉर्म करणार आहेत. यानंतर दुसऱ्या डावात ड्रिंक्स ब्रेक दरम्यान लेझर आणि लाइट शो आयोजित केला जाईल.

सर्व विश्वचषक विजेत्या संघांच्या कर्णधारांना २०२३ च्या विश्वचषक अंतिम सामना पाहण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. पाकिस्तानचे माजी कर्णधार इम्रान खान वगळता सर्व विश्वचषक विजेत्या संघांचे कर्णधार या सामन्याला उपस्थित राहणार आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button