breaking-newsताज्या घडामोडी

नागपूर जिल्ह्यात महिला डॉक्टरवर अ‍ॅसिडहल्ला, तिघे जखमी

नागपूर | महाईन्यूज

हिंगणघाट येथील जळीत जळीत प्रकरणाचे राज्यभर पडसात उमटत असताना सावनेर येथे महिला डॉक्टरवर ऍसिड हल्ला केल्याची घटना गुरुवारी दुपारी 12.30 वाजताच्या सुमारास घडलेली आहे. या हल्ल्यात महिला डॉक्टरसह तिघे जखमी झाले आहेत. शिवाय, घटनास्थळी असलेल्या नागरिकांनी आरोपीस चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केलेले आहे.

संतप्त नागरिकांनी आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी रेटून धरत पोलीस ठाण्याच्या आवारात गोंधळ घातलेला आहे. नागपूर येथील इंदिरा गांधी मेडिकल कॉलेजमध्ये काम करणाऱ्या या महिला डॉक्टर असिसंन्ट लेक्चरर आहेत. त्या गुरुवारी  नेशनल एड्स कंन्ट्रोल आँग्रोनायजेशन या प्रोजेक्टकरीता सर्वे करण्यासाठी गेलेल्या होत्या त्यावेळी सावनेरच्या पहिलेपारजवळच्या कळकळी महाराज मंदिराजवर असताना, आरोपी निलेश कन्हेरे हा २२ वर्षांचा युवक त्यांच्याजवळ आला आणि, तुझा चेहरा खराब करतो असे म्हणत त्याने त्यांच्या चेहऱ्यावर अ‍ॅसिड फेकले आहे. यात या महिला डॉक्टरने चेहरा बाजूला केल्याने या अ‍ॅसिडचे काही कण बाजूला असलेल्या एका विद्यार्थिनीवर व अन्य एका महिलेच्या चेहऱ्यावर पडले. यात या दोघींनाही गंभीर जखमा झाल्या आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button