breaking-newsक्रिडाताज्या घडामोडी

लव्हलिना बोर्गोहेन हिची उपांत्य फेरीत धडक, टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताचे आणखी एक पदक निश्चित

टोकियो – भारतीय बॉक्सर लव्हलिना बोर्गोहेन हिने टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताचे दुसरे पदक निश्चित केले आहे. त्याने ६९ किलो वजनी गटात चायनीज तैपेईच्या खेळाडूचा पराभव करत उपांत्य फेरी गाठली. यासह त्याने पदकही निश्चित केले. त्यामुळे टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताचे हे दुसरे पदक असणार आहे.

लव्हलिना बोर्गोहेन हिचा सामना आता तुर्कीच्या स्पर्धकासोबत होणार आहे.लव्हलिना बोर्गोहेन हिने चायनीज तैपेईच्या चेन एनसीचा ३-२ अशा गुणांनी पराभ केला. त्यानंतर दुसऱ्या फेरीवरही लवलिना हिचाच वरचष्मा दिसून आला. तिने ही फेरी ५-० अशी सहज जिंकत सामन्यावर आणि पदकावर कब्जा केला.

२३ वर्षाची लव्हलिना आसामची आहे. तिने अखेरच्या १६ फेरीच्या सामन्यात तिच्यापेक्षा १२ वर्षांनी मोठ्या असलेल्या जर्मनीच्या नेडिन अपेटचा ३-२ असा पराभव केला होता. लव्हलिनाने पाच परीक्षकांकडून अनुक्रमे 28, 29, 30, 30, 27 असे गुण मिळवले.लव्हलिना ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवणारी भारताची दुसरी भारतीय महिला बॉक्सर बनली आहे. त्याच्या आधी मेरी कोमने लंडन ऑलिम्पिकमध्ये २०१२ मध्ये कांस्यपदक जिंकले होते.बॉक्सिंगमध्ये पुरुष आणि महिला दोघांमध्ये ऑलिम्पिक पदक जिंकणारी लव्हलिना तिसरी भारतीय आहे. पुरुषांमध्ये विजेंदर सिंगने २००८ च्या बीजिंग ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकले होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button