breaking-newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्र

सांगलीमध्ये शिवसैनिकाच्या खूनप्रकरणी पाच अटकेत

सांगली |

तीन दिवसापूर्वी जत तालुक्यातील निगडी येथे झालेल्या शिवसेना कार्यकर्त्यांच्या खुनाचा छडा लावण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाला यश आले असून या प्रकरणी गुरुवारी पाच जणांना अटक करण्यात आली आहे. या पाच पैकी चार आरोपी पुणे जिल्ह्यातील उरवडीचे आहेत. याबाबत माहिती अशी,की जत तालुक्यातील निगडी येथील तुकाराम ताटे या युवकाचा निगडी बनाळी रस्त्यावर असलेल्या शेतातील घरात २६ जुलै रोजी रात्री खून झाला होता. या प्रकरणी पोलिसांनी गुरुवारी सुरेश हिरगोड (वय ३०), अनिल काळेल (वय २९), रामेश्वर जोगदंड (वय ५४), विजय कराळे (सर्व रा. उरवडी, ता. मुळशी, पुणे) आणि तानाजी जाधव (वय ४५ रा. निगडी खुर्द) जत या पाच जणांना अटक केली.

हत्या झालेला तरुण वस्तीवर एकटाच वास्तव्यास असल्याने खुनाबाबत कोणतीही माहिती अथवा पुरावा उपलब्ध होत नव्हता. पोलीस निरीक्षक सर्जेराव गायकवाड व आप्पासाहेब कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक रविराज फडणीस, हवालदार संजय कांबळे, जितेंद्र जाधव, राजू मुळे, अनिल कोळेकर, संदीप नलवडे आदींनी तांत्रिक अंगाने शोध घेऊन गावातीलच तानाजी जाधव याच्याकडे कसून चौकशी केली असता या खुनाचा उलगडा झाला. काही दिवसापूर्वी विजय कराळे याचा आयशर टेम्पो जाधव यांच्या रानात अडकला होता. तो काढण्यासाठी माती काढण्यात आली होती. ही माती ताटे याच्या रानात टाकल्याने वाद झाला होता.  या वादातून ही हत्या करण्यात आल्याची माहिती तपासात निष्पन्न झाली.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button