breaking-newsआंतरराष्टीय

बगदादीचा मुलगा सिरीयात ठार झाल्याचा दावा

बैरुत – इस्लामिक स्टेटचा प्रमुख अबू बक्र अल बगदादी याचा मुलगा सिरीया सरकारच्या सैन्याबरोबर लढताना मारला गेला असल्याचे इस्लामिक स्टेटने म्हटले आहे. इस्लामिक स्टेटच्या सोशल मिडीया अकाउंटवर ही बातमी आज प्रसिद्ध झाली. त्यामध्ये हातामध्ये रायफल घेतलेला हथइफा अल बद्री हा बगदादीचा हा तरुण मुलगा दिसतो आहे.

“इनिमासी’नावाने प्रसिद्ध असलेला हथइफा हा उत्तम योद्धा होता. सिरीयामधील मध्यवर्ती होम्स प्रांतात सिरीया आणि रशियाच्या फौजांबरोबर लढताना तो मारला गेला, असे या सोशल मिडीयावरील वृत्तामध्ये म्हटले आहे.
सिरीयामध्ये जूनच्या पहिल्या दोन आठवड्यांमध्ये इस्लामिक स्टेट विरोधी कारवाई झाली होती, असे सिरीयातील मानवी हक्कविषयक निरीक्षण गटाने म्हटले आहे.

सिरीयात झालेल्या तुफान बॉम्बहल्ल्यांमध्ये अल बगदादी हा मारला गेला किंवा जबर जखमी झाल्याचे वृत्त आले होते. मात्र तो अजूनही जिवंत असल्याचे मानले जात आहे. अल बगदादीच्या कुटुंबियांबाबत फारच थोडी माहिती उपलब्ध आहे. मात्र त्याची पत्नी आणि कन्या मानल्या जाणाऱ्या दोघींना 2014 मध्ये लेबेनानमध्ये ताब्यात घेण्यात आले आहे.

सिरीया आणि इराकमधील बहुतेक भूभागावरून इस्लामिक स्टेटला हुसकावून लावण्यात आले आहे. मात्र अजूनही सिरीयाच्या वाळवंटी प्रदेशात आणि सीमा भागातील दुर्गम भागात अजूनही इस्लामिक स्टेटचे अस्तित्व आहे. सिरीयाच्या पूर्वेकडील देर अल झोर भागात मंगळवारी अमेरिकेच्या नेतृत्वाखालील आघाडी फौजांनी केलेल्या जोरदार बॉम्बहल्ल्यामध्ये किमान 12 दहशतवादी मारले गेले. तर 11 जण नैऋत्य सिरीयाच्या दिशेने पळालेले 11 जण भूसुरुंगाच्या स्फोटात मारले गेले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button