breaking-newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रमहाराष्ट्रराजकारण

घर-शेतीबरोबरच रस्ते, सरकारी इमारतींचे महाबळेश्वरमध्ये अतिवृष्टीने नुकसान

वाई |

महाबळेश्वर तालुक्यात अतिवृष्टीमुळे वैयक्तिक घरे, शेतीबरोबरच रस्ते, पूल, सरकारी इमारती, शाळा यांचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे तत्काळ वस्तुनिष्ठ पंचनामे करावेत, असे आदेश जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिले. अतिवृष्टीमुळे महाबळेश्वर येथील नुकसानीच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. या वेळी आमदार मकरंद पाटील, प्रांताधिकारी संगीता राजापूरकर चौगुले, तहसीलदार सुषमा पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय महेश गोंजारी, पंचायत समिती सभापती संजय गायकवाड, जिल्हा बँकेचे संचालक राजेंद्र राजपुरे, मुख्याधिकारी पल्लवी पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

महाबळेश्वर तालुक्यात मोठे नुकसान आहे. अनेक गावे संपर्कहीन आहेत. अधिकाऱ्यांनी जागेवर जाऊन पंचनामे करावेत.तालुक्यातील ११३ पैकी ६७ गावांमध्ये आज आपला संपर्क झाला आहे. पण ५६ गावांत अद्याप जाता येत नाही, तर उरलेल्या दहा गावांत कोणत्याही मार्गाने पुढील काही दिवस पोहोचता येणार नाही. बंद असलेल्या कुंभरोशी तापोळा मार्ग चार दिवसांत तर पोलादपूर हा मार्ग पाच दिवसांत सुरू होत आहे. कुंभरोशी ते महाबळेश्वर या मार्गाचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाल्याने हा मार्ग पुढील महिनाभरात सुरू करण्याचे प्रयत्न आहेत. महाबळेश्वर ते शिंदी या भागात सध्या पोचता येत नाही. त्यामुळे या भागात रस्त्यांचे नुकसानीची माहिती मिळाली नाही. कांदाटी, कोयना पुलाची कामे सुरू आहेत. ५२ ठिकाणी छोटय़ामोठय़ा पुलांची आवश्यकता आहे. त्यासाठी ४७ कोटी रुपयांची तर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्त्यांसाठी ८० कोटी रुपयांची आवश्यकता आहे.

तालुक्यातील रस्ते पूल घाटांच्या नुकसानीची माहिती चित्रफितीद्वारे जिल्हाधिकाऱ्यांना दिली. तालुक्यात ४३४२ हेक्टर भातशेतीचे क्षेत्र आहे. यापैकी साधारण साडेतीन हजार हेक्टर क्षेत्रातील शेतीचे अतिवृष्टीमुळे नुकसान झाले आहे. तालुक्यात असलेल्या १३८ पाणीपुरवठा योजनांपैकी ३३ पेक्षा अधिक पाणीपुरवठा योजनांचे नुकसान या अतिवृष्टीमुळे झालेले आहे. तालुक्यातील केवळ दहा गावांत आज वीजपुरवठा खंडित आहे. रस्त्याअभावी या गावातील वीजपुरवठा सुरळीत करण्यात अडचणी येत आहेत. प्राथमिक शाळा व अंगणवाडी इमारतीचे नुकसान झाले आहे. समाजमंदिरांचे नुकसान झाल्याचे गटविकास अधिकारी नारायण घोलप यांनी सांगितले. महाबळेश्वर शहर नुकसानीचा आढावा मुख्याधिकारी पल्लवी पाटील, पाचगणी शहर नुकसानीची माहिती मुख्याधिकारी गिरीश दापकेकर यांनी दिली. बैठकीसाठी वनक्षेत्रपाल रंजन सिंग परदेशी, पोलीस निरीक्षक बी ए कोंडूभैरी, प्रवीण भिलारे, रोहित ढेबे, सुरेश सपकाळ, आगार व्यवस्थापक नामदेव पतंगे, सहायक पोलीस निरीक्षक सतीश पवार आदी उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button