breaking-newsमनोरंजन

‘खुलता कळी खुलेना’ मालिकेतील अभिनेत्री मयुरीच्या पतीची आत्महत्या

नांदेड – ‘खुलता कळी खुलेना’ या गाजलेल्या टीव्ही मालिकेतील नामवंत अभिनेत्री मयुरी देशमुख हिचा पती आणि उदयोन्मुख अभिनेता आशुतोष भाकरे याने आत्महत्या केल्याची घटना काल नांदेडमध्ये घडल्याने मराठी सिनेसृष्टीत खळबळ उडाली आहे.

नांदेडमधील गणेश नगर इथल्या घरी मयुरी आणि आशुतोषची आई काल सकाळी ११ ते १२ वाजण्याच्या सुमारास घरात गप्पा मारत बसल्या होत्या. त्यावेळी आशुतोष वरच्या खोलीत होता. बराच वेळ झाला आशुतोष खाली आला नाही. त्यावेळी त्याचा दरवाजा ठोठावल्यानंतरही प्रतिसाद न मिळाल्याने, दुसऱ्या बाजूने खोलीत डोकावून पाहिले. त्यावेळी आशुतोष लटकलेल्या अवस्थेत दिसला आणि एकच थरकाप उडाला. अवघ्या ३२व्या वर्षी आशुतोषने नैराश्यातून आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. मात्र आत्महत्येचे नेमके कारण पोलीस तपासात समोर येईल.

अभिनेत्री मयुरी देशमुख ही ‘खुलता कळी खुलेना’ या झी मराठीवरील मालिकेतून घराघरात पोहोचली आहे. आशुतोष आणि मयुरी देशमुख हे २१ जानेवारी २०१६ रोजी लग्नबंधनात अडकले होते. आशुतोषचे आई-वडील नांदेडमधील ख्यातनाम डॉक्टर आहेत. मयुरी आणि आशुतोषमध्ये कोणतेही मतभेद नव्हते, असे त्यांच्या जवळचे मित्र सांगतात. लॉकडाऊनमध्ये दोघेही एकत्र होते. सध्या मयुरीही नांदेडमध्येच आहे. दोघांमध्ये कोणतेही मतभेद किंवा त्यांना कोणतीही आर्थिक चणचण नव्हती. त्यामुळे आशुतोषने आत्महत्या का केली, असा प्रश्न मित्रपरिवाराला पडला आहे. आशुतोषने काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर माणूस आत्महत्या का करतो या विषयावर एक व्हिडीओ शेअर केला होता. आशुतोष भाकरेने ‘भाकर’, ‘इच्यार ठरला पक्का’ या चित्रपटात भूमिका साकारली होती. ‘जुन-जुलै’ या बहुचर्चित नाटकाची निर्मिती त्याने केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button