breaking-newsTOP NewsUncategorizedताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

लोकसभा निवडणूक रणसंग्राम: भाजपकडून महाराष्ट्रातील उमेदवारांची दुसरी यादी जाहीर, कुणाकुणाला संधी?

भाजप महाराष्ट्रात 48 पैकी 23 जागांवर लढणार : राष्ट्रवादी, शिवसेनेच्या उमेदवारीला मुहूर्त मिळेना!

मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठी बातमी समोर आली आहे. भाजपकडून महाराष्ट्रातील उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत महाराष्ट्रातील तीन जागांचा समावेश आहे. सोलापुरात राम सातपुते यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलं आहे. या जागेवर सध्या भाजपचे जयसिद्धेश्वर स्वामी खासदार आहेत. जयसिद्धेश्वर स्वामींचं यावेळी तिकीट कापलं गेलं आहे. राम सातपुतेंना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. भंडारा-गोंदियातून सुनील मेंढे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर गडचिरोली-चिमूर मतदारसंघासाठी अशोक नेते यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. अशोक नेते यांना भाजपकडून पुन्हा संधी देण्यात आली आहे. भाजपकडून याआधी 20 उमेदवार जाहीर करण्यात आले होते. त्यानंतर आज तीन उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. त्यामुळे भाजप महाराष्ट्रात 48 पैकी 23 जागांवर लढणार असल्याचं निश्चित झालं आहे. महायुतीचं जागावाटपावर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा बंगल्यावर बैठक पार पडल्यानंतर भाजपकडून उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे.

भाजपकडून प्रत्येक मतदारसंघात सर्व्हे करण्यात आला होता. प्रत्येक मतदारसंघात कोण निवडून येऊ शकतं याचा विचार करुनच उमेदवार निवडण्याची रणनीती भाजपने ठरवली होती. पण या यादीतून भाजप 23 जागाच लढवण्याची शक्यता होती. भाजपचा 2019 च्या लोकसभा निवडणुकीवेळी 23 जागांवर विजय झाला होता. त्यानंतर आता भाजपकडून दोन यादी जाहीर करण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतंच याबाबत प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली होती. आमची यादी जवळपास जाहीर झालीय. आता फक्त काही जागांसाठी उमेदवारांची यादी घोषित होईल, असं सूचक वक्तव्य फडणवीसांनी केलं होतं. त्यानंतर आता भाजपकडून तीन उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे.

सोलापुरात राम सातपुते विरूद्ध प्रणिती शिंदे लढत

भाजपच्या दुसऱ्या यादीत महत्त्वाची गोष्ट म्हणजे सोलापूरचे खासदार सिद्धेश्वर महाराज यांचं तिकीट कापण्यात आलं आहे. त्यांच्याऐवजी राम सातपुते यांना संधी देण्यात आली आहे. त्यामुळे सोलापूरमध्ये आता भाजपचे राम सातपुते विरूद्ध काँग्रेसच्या प्रणिती शिंदे असा सामना रंगणार आहे. राम सातपुते पहिल्या टर्मचे माळशिरसचे आमदार आहेत. त्यांनी दोन दिवसांपूर्वीच देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर येऊन त्यांची भेट घेतली होती.

भाजपच्या पहिल्या यादीतील उमेदवार कोण?

नंदुरबार – हिना गावित
धुळे – सुभाष भामरे
जळगाव – स्मिता वाघ
रावेर – रक्षा खडसे
अकोला – अनूप धोत्रे
वर्धा – रामदास तडस
नागपूर – नितीन गडकरी
चंद्रपूर – सुधीर मुनगंटीवार
नांदेड – प्रताप पाटील चिखलीकर
जालना – रावसाहेब दानवे
दिंडोरी – भारती पवार
भिंवडी – कपिल पाटील
उत्तर मुंबई – पियूष गोयल
मुंबई उत्तर पूर्व – मिहिर कोटेचा
पुणे – मुरलीधर मोहोळ
अहमदनगर – सुजय विखे पाटील
बीड – पंकजा मुंडे
लातूर – सुधाकर श्रृंगारे
माढा – रणजितसिंह निंबाळकर
सांगली – संजय काका पाटील

भाजपची दुसरी यादी

सोलापूर – राम सातपुते
भंडारा-गोंदिया – सुनील मेंढे
गडचिरोली-चिमूर – अशोक नेते

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button