breaking-newsमुंबई

सरगम इमारत आग: रिलायन्स रिअल्टर्सच्या तीन भागीदारांवर मनुष्यवधाचा गुन्हा

मुंबई उपनगरातील टिळक नगर चेंबूर या ठिकाणी असलेल्या सरगम इमारतीला आग लागली. या आगीत पाच जणांचा मृत्यू झाला. या प्रकरणी आता टिळकनगर पोलीस ठाण्यात सरगम सोसायटीचे सचिव विवेकानंद वायंगणकर यांच्या तक्रारीवरून रिलायन्स रिअल्टर्सच्या तीन भागीदारांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हेमेंद्र मापास, सुभक मापास आणि कोठारी अशी या तिघांची नावं आहेत. भादवि कलम ३०४(२),३३६,४२७ आणि ३४ अन्वये गुन्हा दाखल करणायत आला. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक काळे करीत आहेत.

टिळक नगर या ठिकाणी सरगम सोसायटीत 11 व्या मजल्यावर लागलेल्या आगीत पाचजणांचा मृत्यू झाला. अग्निशमन विभागाचे जवान छगन वाळूंज यांना श्वास घेण्यासाठी त्रास होत असल्याने त्यांना राजवाडी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात  आले. या दुर्दैवी घटनेत पाच वायोवृद्धांचा मृत्यू झाला. त्याचमुळे या प्रकरणी सोसयाटीचे सचिव यांनी पोलिसात धाव घेतली. सरगम इमार रिलायन्स रिअल्टर्सच्या तीन भागीदारांना हेमेंद्र मापास, सुभक मापास आणि कोठारी यांना रहिवाशांनी २००६ मध्ये पुनर्विकासासाठी दिली होती. इमारतीचे बांधकाम झाल्यानंतर रहिवाशांना सदर इमारत २०१४ मध्ये पुन्हा वास्तव्यासाठी देण्यात आली. इमारतीत विकासकांनी अग्निशमन यंत्रणेसंदर्भातली योग्य काळजी घेतली नव्हती. अग्निशमन दलाच्या नियमानुसार विकासकांनी १५ व्या माळ्यावरील आपत्कालीन जागा भिंत घालून बंद केली होती. ज्यामुळे बी-विंग आणि सी विंग यांच्यातला येण्याजाण्याचा रस्ताच बंद झाला होता. यामुळेच घटनेनंतर वयोवृद्ध असलेल्या रहिवाशांना बाहेर पडता आले नाही.या इमारतीला अग्निशमन दलाचे ना हरकत प्रमाणपत्र मिळाले नाही अशीही बाब आता समोर आली आहे. विकासकाने ही काळजी न घेताच इमारत रहिवाशांना वास्तव्यासाठी दिली. त्यामुळे या तिन्ही विकासकांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button