breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमराठवाडामहाराष्ट्रराजकारण

Lok Sabha Election 2024 बच्चू कडू महायुतीविरोधात लढणार, अमरावतीतून देणार उमेदवार!

महायुतीविरोधात जात अमरावतीची जागा लढवण्याचा निर्णय

मुंबई :  प्रहार जनशक्‍ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी वेळोवेळी महायुतीबाबत त्यांची नाराजी बोलून दाखवली आहे. बच्चू कडू यांच्या पक्षाने अमरावती लोकसभा मतदार संघाची मागणी केली होती. मात्र उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमरावतीची जागा भाजपच लढेल असे जाहीर केले होते. त्यामुळे बच्‍चू कडू यांनी महायुतीविरोधात जात अमरावतीची जागा लढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे बच्चू कडू महायुतीतून बाहेर पडण्‍याची शक्‍यता वर्तवली जात आहे.

बच्चू कडू यांनी अमरावतीतून उमेदवार जाहीर करणार असल्याचे सांगतच 6 एप्रिलला ते उमेदवाराच्या नावाची घोषणा करणार आहेत. दरम्यान भाजपच्या कमळ चिन्हावर अमरावतीतून खासदार नवनीत राणा निवडणूक लढण्याची शक्यता आहे. राणा सध्या अमरावतीत प्रचार करत आहे. त्यामुळे बच्‍चू कडू यांच्‍या प्रहार जनशक्‍ती पक्षाने निवडणुक लढण्याचे ठरवल्याने महायुतीच्‍या अडचणी वाढणार आहेत.

याआधीही बच्चू कडू यांनी महायुतीमधून बाहेर पडण्याचा इशारा दिला आहे. ‘वेळ आलीच तर महायुतीतून बाहेर पडून आम्ही लोकसभेसाठी उमेदवार देऊ,’ असा इशारा भाजपच्या नेत्यांना दिला आहे. अमरावती लोकसभा मतदारसंघातून भाजपने नवनीत राणा यांना उमेदवारी देण्याचे निश्चित केले आहे. पण बच्चू कडू यांनी या जागेवर दावा केला आहे. या ठिकाणी आमचे दोन आमदार आहेत. किमान एक लाख आमची मते आहेत. त्यामुळे या मतदारसंघावर आमचाच दावा आहे. त्यामुळे आम्ही कोणत्याही परिस्थिती नवनीत राणा यांना पाठिंबा देणार नाही, अशी भूमिका त्यांनी मांडली होती.

​प्रहार जनशक्‍ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी वेळोवेळी महायुतीबाबत त्यांची नाराजी बोलून दाखवली आहे. बच्चू कडू यांच्या पक्षाने अमरावती लोकसभा मतदार संघाची मागणी केली होती. मात्र उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमरावतीची जागा भाजपच लढेल असे जाहीर केले होते. त्यामुळे बच्‍चू कडू यांनी महायुतीविरोधात जात अमरावतीची जागा लढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे बच्चू कडू महायुतीतून बाहेर

प्रहार जनशक्‍ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी वेळोवेळी महायुतीबाबत त्यांची नाराजी बोलून दाखवली आहे. बच्चू कडू यांच्या पक्षाने अमरावती लोकसभा मतदार संघाची मागणी केली होती. मात्र उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमरावतीची जागा भाजपच लढेल असे जाहीर केले होते. त्यामुळे बच्‍चू कडू यांनी महायुतीविरोधात जात अमरावतीची जागा लढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे बच्चू कडू महायुतीतून बाहेर पडण्‍याची शक्‍यता वर्तवली जात आहे.

बच्चू कडू यांनी अमरावतीतून उमेदवार जाहीर करणार असल्याचे सांगतच 6 एप्रिलला ते उमेदवाराच्या नावाची घोषणा करणार आहेत. दरम्यान भाजपच्या कमळ चिन्हावर अमरावतीतून खासदार नवनीत राणा निवडणूक लढण्याची शक्यता आहे. राणा सध्या अमरावतीत प्रचार करत आहे. त्यामुळे बच्‍चू कडू यांच्‍या प्रहार जनशक्‍ती पक्षाने निवडणुक लढण्याचे ठरवल्याने महायुतीच्‍या अडचणी वाढणार आहेत.

याआधीही बच्चू कडू यांनी महायुतीमधून बाहेर पडण्याचा इशारा दिला आहे. ‘वेळ आलीच तर महायुतीतून बाहेर पडून आम्ही लोकसभेसाठी उमेदवार देऊ,’ असा इशारा भाजपच्या नेत्यांना दिला आहे. अमरावती लोकसभा मतदारसंघातून भाजपने नवनीत राणा यांना उमेदवारी देण्याचे निश्चित केले आहे. पण बच्चू कडू यांनी या जागेवर दावा केला आहे. या ठिकाणी आमचे दोन आमदार आहेत. किमान एक लाख आमची मते आहेत. त्यामुळे या मतदारसंघावर आमचाच दावा आहे. त्यामुळे आम्ही कोणत्याही परिस्थिती नवनीत राणा यांना पाठिंबा देणार नाही, अशी भूमिका त्यांनी मांडली होती.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button