ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

नोटरीसाठी पंधरा वर्षांची व्यवसाय मर्यादा अमान्य – ॲड. ज्ञानेश्वर केदारी

पिंपरी चिंचवड | नोटरी व्यवसायिक वकिल यांच्यासाठी 15 वर्षे व्यवसाय मर्यादा निश्चित करण्यात येणार आहे. विधी सल्लागार व सक्षम आधिकारी न्याय विभाग मंत्रालय, दिल्ली यांनी यासंदर्भात दुरुस्ती प्रस्ताव मांडला आहे. हा प्रस्ताव नोटरी संघटनेला व नोटरी बांधवांना अमान्य असल्याचे, ‘दि नोटरीज असोसिएशन ऑफ महाराष्ट्रा’चे सचिव ॲड. ज्ञानेश्वर केदारी यांनी म्हटले आहे.नव्याने येऊ घातलेल्या नोटरीज कायदा 2021 अमेंडमेंट नुसार कलम 5 (2) द्वारा काही बदल सुचवण्यात आले आहेत. त्यानुसार पूर्वीच्या अमर्यादित व्यवसाय मर्यादेवर बंधन घालण्यात आले असून नोटरी व्यवसाय पंधरा वर्षच करता येणार आहे. पाच वर्षाच्या तीन टर्म असे मिळून एकूण 15 वर्षांचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे. त्यानंतर नोटरी प्रमाणपत्र रद्द करण्यात येणार आहे. यामुळे नोटरी बांधवांच्या व्यवसाय स्वातंत्र्यावर गदा येत असल्याचे ॲड. केदारी म्हणाले.

‘नवीन प्रस्तावामुळे नोटरी वकिलांचे जीवनमान विस्कळीत होऊ शकते. नवीन गुणवान नोटरी वकिलांना संधी द्यायला हवी परंतु पंधरा वर्षे सेवा पूर्ण झालेल्या नोटरी बांधवांना वयाच्या साठीत अर्थार्जन करणे मुश्कील होईल. नोटरी वकिलांच्या सेवेतील समानता व प्रतिष्ठा जपली जावी यासाठी समितीने दुरुस्ती मसुद्याचा पुनर्विचार करुन सदर प्रस्ताव मागे घ्यावा,’ अशी मागणी ज्ञानेश्वर केदारी यांनी पत्रकाद्वारे केली आहे.

प्रस्ताव मागे न घेतल्यास येणाऱ्या काळात तीव्र आंदोलन करु तसेच, उच्च न्यायालयात दाद मागू असा इशारा देखील केदारी यांनी दिला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button