breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडराजकारण

रहाटणी, पिंपळे सौदागरमध्ये संजोग वाघेरे पाटील यांचे जल्लोषात स्वागत

पिंपरी : संजोग वाघेरे पाटील हे पिंपरी चिंचवड महापालिकेचे दिवंगत महापौर भिकनशेठ वाघेरे यांचे सुपुत्र आहेत. त्याच्या कुटुंबाला राजकीय वारसा आहे. संजोग वाघरे पाटील हे पिंपरी गावातून नगरसेवक म्हणून निवडून आले होते. त्यांना बराच राजकारणाचा अनुभव आहे. त्यांच्या पत्नी उषाताई वाघेरे या माजी नगरसेविका आहेत. शांत, संयमी आणि सर्वांना आपलं वाटणारं संजोग वाघेरे यांचं नेतृत्व आहे. त्यांची हीच ओळख त्यांना सर्वांपर्यंत पोहोचत आहे. तसेच पिंपरी-चिंचवडसह मावळ लोकसभा मतदारसंघात त्यांना नातेवाईकांचा भरघोस पाठिंबा मिळत आहे. पिंपरी, चिंचवड, मावळ विधानसभेसह रायगड जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघात त्यांनी आपले स्थान निर्माण केले आहे.

मावळ लोकसभा मतदार संघाचे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांची लोकप्रियता प्रचंड वाढत आहे. संजोग वाघेरे पाटील यांना समाजसेवेची तळमळ आणि मावळ लोकसभा मतदारसंघात विकासाचा ध्यास आहे. त्यामुळेच वाघेरे यांनी सुरु केलेल्या गावभेट दौऱ्याला रहाटणी, पिंपळे सौदागर येथील नागरिकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. यावेळी मावळ लोकसभेत कारभारी बदलाची नांदी असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

हेही वाचा – लोकसभा निवडणूक रणसंग्राम :शिवतारेंची शरद पवार- अजित पवारांवर जहरी टीका; म्हणाले, एक राक्षस तर दुसरा…!

शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे मावळ लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांची समाजाप्रती असलेली तळमळ आणि लोकप्रियता पाहून रहाटणी आणि पिंपळे सौदागर येथील नागरिकांनी पाठीशी उभे राहण्याचा निर्धार केला असल्याचे दिसून येत आहे. मावळ लोकसभेचे शिलेदार संजोग वाघेरे पाटील यांनी नुकताच रहाटणी आणि पिंपळे सौदागर परिसरात गावभेट दौरा केला. यावेळी उत्साहाच्या वातावरणात त्यांचे महिलांनी औक्षवन केले. हार आणि पुष्पगुच्छ देवून नागरिकांनी त्यांचे स्वागत करण्यात केले.

यावेळी पिंपळे सौदागर येथे माजी विरोधी पक्षनेते नगरसेवक नाना काटे, जयनाथ काटे, नगरसेवक बापू काटे, गणपती कुंजीर, योगेश काटे, गोरख काटे, उमेश काटे, शेखर कुटे, अजिंक्य भिसे, कैलास कुंजीर, मिलिंद काटे, संतोष नवले, कपिल कुंजीर, संजू भिसे, काटे वस्ती येथील शशी काटे, राजू शेलार, मयूर काटे,  शिवाजी भिसे, उन्नती फाउंडेशनचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते संदीप काटे, महेंद्र झिंजूडे, शरद कुटे, नवनाथ धनवटे, अजिंक्य साठे, गुंडा काटे, सागर भिसे, उद्योजक वसंत काटे, विठ्ठल झिंजुर्डे, नंदू काटे,  मुंजोबा चौक येथील सचिन झिंजुर्डे, दत्ता काटे, बाळासाहेब काटे, अर्जुन काटे, बाळासाहेब काटे, मच्छिंद्र काटे, सनी काटे, सुरज काटे, क्रांती मित्र  मंडळाचे पदाधिकारी, जगदीश काटे, देवा मुरकुटे, सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब राक्षे, आशिष काटे, सुरेश काटे, शिवराज काटे, सागर काटे, दिवानजी काटे, युवराज काटे, संतोष काटे, शहाजी काटे, आदित्य काटे, प्रतीक काटे, पंडित काटे, कुंजीर वॉशिंग सेंटर येथील उपेश, भानदास काटे यांच्यासह पिंपळे सौदागर आणि रहाटणी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button