breaking-newsताज्या घडामोडीपुणे

#Lockdown: घाऊक भुसार बंदच

पुणे : मार्केट यार्डातील भुसार बाजारात करोनाचा संसर्ग आढळल्यानंतर भुसार बाजारातील व्यापाऱ्यांनी मंगळवारपासून (१९ मे) पुकारलेल्या बंदबाबत विचारविनिमय करण्यासाठी आयोजित बैठकीत बंद कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. दरम्यान, बंदबाबत विचार करण्यासाठी येत्या शनिवारी (२३ मे) व्यापाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात येणार आहे.

बंदच्या भूमिकेबाबत व्यापाऱ्यांची बैठक मंगळवारी पार पडली. या बैठकीत भुसार बाजारातील व्यापाऱ्यांनी बंद सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला. शनिवारी व्यापाऱ्यांची पुन्हा बैठक आयोजित करण्यात येईल. त्यानंतर पुढील निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती भुसार बाजारातील व्यापाऱ्यांची शिखर संघटना असलेल्या दी पूना र्मचट्स चेंबरचे अध्यक्ष पोपटलाल ओस्तवाल यांनी दिली. पदाधिकारी विजय मुथा, जवाहरलाल बोथरा, प्रवीण चोरबेले, नितीन नहार,  अशोक लोढा, रायकुमार नहार यांच्यासह बाजारातील व्यापारी वर्ग बैठकीस उपस्थित होते.

ओस्तवाल म्हणाले, भुसार बाजारात करोनाचा  संसर्ग आढळून आला आहे. व्यापारी, त्यांचे कुटुंबीय तसेच कामगार वर्ग भयभीत आहेत. पणन संचालक आणि बाजार समितीचे प्रशासक बी. जे. देशमुख यांच्याबरोबर चर्चा करण्यात आली आहे. व्यापारी बाजार सुरू करण्याबाबत सकारात्मक असले, तरी बाजार आवाराचे निर्जंतुकीकरण करण्याची गरज आहे. व्यापार सुरू करण्याबाबत पुरेशी काळजी घेणे गरजेचे आहे. बाजार समितीकडून भुसार बाजारात उपाययोजना करण्याबाबत आश्वासन देण्यात आले आहे. करोनाच्या संसर्गाला अटकाव घालण्यासाठी काही काळ व्यापार बंद ठेवावे लागणार आहेत. शनिवारी पुन्हा व्यापाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात येईल. त्यानंतर पुढील निर्णय घेण्यात येणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button