breaking-newsताज्या घडामोडीपुणे

वाळू माफिया गुंड अप्पा लोंढेच्या खुनातील आरोपीला जामीन

पुणे : दौंड,  हवेली तालुक्यातील वाळू माफिया गुंड अप्पा लोंढे याच्या खून प्रकरणातील आरोपीला जामीन मिळाल्यानंतर येरवडा कारागृहाबाहेर जल्लोष करणाऱ्या ११ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

संचारबंदीच्या आदेशाचा भंग केल्याप्रकरणी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाला ठुसे (वय ३९, रा.अष्टापूर,ता. हवेली), गणेश चोंधे (वय ३८,रा. महंमदवाडी, हडपसर), गणेश काळे (वय ३०,रा.वडगाव शेरी), सोपान मडके (वय ३८, रा. काळेपडळ, हडपसर), शिरीष कारले (वय २६, रा.खेरपाल, जि.अहमदनगर), संतोष गव्हाणे (वय २८), योगेश गव्हाणे (वय २८), दादा गव्हाणे (वय २८, दोघे रा. श्रीगोंदा, जि. अहमदनगर), नितीन सोडनवर (वय ३८,रा. बोरीपार्धी, ता. दौंड), अंकुश मल्लाव (वय ४०,रा. येरवडा), संदीप जगदाळे (रा. करडे, ता. शिरूर) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. पोलीस नाईक सचिन रणदिवे यांनी या संदर्भात येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अप्पा लोंढेची दौंड, हवेली तालुक्यात दहशत होती. वाळू तस्करीत लोंढे सक्रिय होता. २०१५ मध्ये लोणीकाळभोरमध्ये त्याचा खून करण्यात आला होता. या खून प्रकरणात विष्णू यशवंत जाधव आरोपी आहे. करोनाच्या संसर्ग टाळण्यासाठी गेल्या दीड महिन्यांपासून किरकोळ तसेच गंभीर गुन्ह्य़ातील आरोपींना जामीन देण्यात येत आहे. जाधवला नुकताच न्यायलयाकडून जामीन मंजूर करण्यात आला. दोन दिवसांपूर्वी जाधवची जामिनावर सुटका करण्यात आली. त्या वेळी जाधवचे समर्थक येरवडा कारागृहाबाहेर जमले होते. त्यांनी जाधव कारागृहाबाहेर पडताच जल्लोष केला. संचारबंदीच्या आदेशाचा भंग तसेच सामाजिक अंतर न पाळल्याप्रकरणी ११ जणांविरोधात राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा, महाराष्ट्र कोविड १९ च्या कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. सहायक पोलीस निरीक्षक बलभीम ननावरे तपास करत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button