breaking-newsपिंपरी / चिंचवड

शैक्षणिक सुविधांचा विचार करुन तळेगावात होणार मुलींचे वसतिगृह

पिंपरी |महाईन्यूज|

सामाजिक न्याय विभागाच्या वतीने मावळ तालुक्‍यातील तळेगाव दाभाडे याठिकाणी मागासवर्गीय मुलींच्या वसतिगृह होणार आहे. शैक्षणिक सुविधांचा विचार करून हा निर्णय घेतला आहे.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 व्या जयंती वर्षानिमित्त राज्यात मागासवर्गीय मुलींसाठी एकूण 50 वसतिगृह सुरू करण्यास मान्यता दिली आहे. यामध्ये विभागस्तरावर 250 क्षमतेची 7 तर, तालुकास्तरावर 100 क्षमतेची 43 वसतिगृहे उभारण्याचे प्रस्तावित आहे. त्यापैकी पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्‍यात वडगाव मावळ याठिकाणी एक वसतिगृह उभारण्याचे नियोजन केले होते.

मात्र, हे वसतिगृह सुरू करण्यासाठी त्याठिकाणी पुरेशी शासकीय जागा अथवा भाडेतत्त्वावर घेण्यासाठी इमारतदेखील उपलब्ध नसल्याची बाब समाजकल्याण आयुक्‍त कार्यालयाच्या वतीने पत्राद्वारे वरिष्ठ पातळीवर कळवली आहे. याशिवाय, वडगाव मावळ याठिकाणी पुरेशा प्रमाणात शैक्षणिक सुविधा उपलब्ध नसल्याची बाब निदर्शनास आली आहे. त्याऐवजी तळेगाव दाभाडे येथे शैक्षणिक सुविधा अधिक प्रमाणात उपलब्ध असल्याने वसतिगृहासाठी निवड केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button