breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

#Lockdown : कोरोनामुक्त महिलेचे ढोल बडवून स्वागत, माजी महापौर मंगला कदम यांच्यासह चौघांवर गुन्हा

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

लॉकडाऊनच्या काळात कोरोनामुक्त महिलेचे ढोल ताशांच्या गजरात स्वागत करणे राष्ट्रवादी काँग्रेसला चांगलेच महागात पडले आहे. पिंपरी-चिंचवडच्या माजी महापौर आणि विद्यमान नगरसेविका मंगला कदम यांच्यासह चार जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. हा प्रकार गुरुवारी (दि. 30) दुपारी अडीच वाजता संभाजीनगर, चिंचवड येथे घडला.

नगरसेविका मंगला कदम, अमेय सुधीर नेरुरकर, कल्पेश गजानन हाने, संतोष शिवाजी वराडी (सर्व रा. संभाजीनगर, चिंचवड) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एक दाम्पत्य कोरोनामुक्त होऊन गुरुवारी घरी परतले. त्यावेळी त्या दाम्पत्त्याचा ढोल ताशा आणि पुष्पवृष्टी करून स्वागत केले. यावेळी बेकायदेशीर जमाव एकत्र आला. यामुळे कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होण्याची भीती निर्माण झाली. तसेच शासनाने दिलेल्या संचारबंदी, जमावबंदीच्या आदेशाचेही उल्लंघन झाले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button