breaking-newsताज्या घडामोडीमुंबईराजकारण

समान किमान कार्यक्रम जाहीर; ५०० चौरस फुटांचे घर, १० रुपयांत जेवण आणि कर्जमाफी

मुंबई | शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्यातील युतीचा आधार ठरलेला महाविकासआघाडीचा ‘समान किमान कार्यक्रम’ अखेर समोर आला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज शिवतीर्थावर मुख्यमंत्रीपदाची शपथ घेत आहेत. तत्पूर्वी महाविकासआघाडीकून ‘समान किमान कार्यक्रमाचा’ मसुदा जाहीर करण्यात आला. या मसुद्यावर तिन्ही पक्षांतील प्रमुख नेत्यांच्या स्वाक्षऱ्या पाहायला मिळत आहेत.

  • अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ मदत.
  • शेतकऱ्यांना तात्काळ कर्जमाफी
  • शेतकऱ्यांना तात्काळ नुकसानभरपाई मिळण्यासाठी पीकविमा योजनेचे नुतनीकरण
  • राज्य शासनातील रिक्त सरकारी पदे भरण्याची प्रक्रिया तात्काळा सुरु करणार-
  • सुशिक्षित बेरोजगारांना भत्ता
  • नोकऱ्यांमध्ये स्थानिक तरुणांना ८० टक्के आरक्षण
  • शिक्षणाचा दर्जा उंचावणार
  • आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आणि शेतमजुरांच्या उच्च शिक्षणासाठी शुन्य टक्के व्याजदर कर्ज योजना राबवणार
  • सर्वसामान्य जनतेच्या आरोग्याच्या रक्षणासाठी तालुका स्तरावर एक रुपया क्लिनिक योजना सुरु करणार.
  • सर्व जिल्ह्यांमध्ये टप्याटप्याने वैद्यकीय महाविद्यालयासह सुपर स्पेशालिटी रुग्णालये उभारणार.
  • राज्यातील प्रत्येक नागरिकाला आरोग्य विमा कवच देणार
  • आर्थिक दुर्बल कुटुंबातील मुलींचे महाविद्यालयीन शिक्षण विनामूल्य करणार
  • महानगर आणि जिल्हा मुख्यालयांमध्ये काम करणाऱ्या महिलांसाठी वसतीगृहे
  • वर्किंग वुमनसाठी हॉस्टेल बांधणार
  • अंगणवाडी सेविका तसेच आशा सेविका आणि आशा गट प्रवर्तकांच्या मानधन आणि सेवा सुविधेमध्ये वाढ
  • महिला बचत गट सक्षमीकरणासाठी सर्वोच्च प्राधान्य
  • मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या धर्तीवर मुख्यमंत्री शहर सडक योजना अंमलात आणून सर्व नगरपरिषदा, नगरपालिका, नगरपंचायती व महानगरातील रस्त्यांसाठी स्वतंत्र आर्थिक तरतूद करणार.
  • मुंबई आणि उर्वरित महाराष्ट्रात झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पातंर्गत ३०० चौरस फुटांऐवजी ५०० चौरस फुट चटईक्षेत्र असलेल्या सदनिका देण्यात येतील. त्यामध्ये उत्तम पायाभातू सुविधा प्राधान्याने पुरविण्यात येतील.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button