breaking-newsपुणे

#Lockdown:पुण्यातील 150 उद्याने पुन्हा खुली

  • ज्येष्ठ नागरिक-महिलांना प्रवेशबंदी

पुणे : राज्य सरकारने लॉकडाऊन 5 च्या नियमावलीत सूट दिली आहे. राज्यात आजपासून मिशन बिगीन अगेन सुरु होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर सायकलिंग, रनिंग, वॉक, व्यायाम या सर्व गोष्टींना परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे आता पुणेकरांना रोज मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडता येणार आहे.

पुणे शहरातील 199 पैकी 150 उद्याने उद्या मंगळवारपासून सुरु होणार आहेत. या उद्याने किंवा मैदानात मंगळवारपासून मॉर्निंग वॉक करता येणार आहे.

मात्र कोरोनाबाधित क्षेत्रातील उद्याने बंद राहणार आहे. तसेच ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना या उद्यानात प्रवेश करता येणार आहे. पुणे शहरातील मैदाने किंवा उद्याने सुरु होणार असली तरी मॉल, मल्टिप्लेक्स, रेस्टॉरंट, धार्मिकस्थळे पुढील काही दिवस बंद राहणार आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button