breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

रेल्वे रुळावरून घसरले पार्सल व्हॅनचे दोन डबे, वर्धा रेल्वे स्थानक वरील घटना

वर्धा | वर्धेकडून दक्षिणेकडे जाणारी रेल्वेची पार्सल व्हॅन वर्धेतील बजाज उड्डाण पुलाच्या खाली काही अंतरावर 758/24 या ठिकाणी रुळाखाली घसरली. हा अपघात रविवार 31 रोजी सायंकाळी 6.38 मिनिटांनी झाला. लॉकडाऊनमुळे अन्य रेल्वे बंंद असल्याने सुदैवाने मोठा अपघात टळला. लॉकडाऊनमुळे रेल्वे विभागाचे वतीने मालगाड्यामधून साहित्याची ने आण करण्यात येत आहे.रविवारी सायंकाळी 6.30 वाजता 22 डब्ब्याची मालगाडी वर्धा रेल्वेस्थानकावरून निघाली. बजाज चौकातील ओव्हर ब्रीज पार करताच रेल्वेच्या इंजिनपासून पाच व सहा नंबरच्या 094415 व 0933313 क्रमांकाचे दोन डब्बे रूळावरून उतरले. 5 नंबरच्या डब्ब्याचे एक चाक व एक स्प्रींग तुटल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येते. ही ट्रेन बल्लरशाहकडे जात होती. यामुळे संथ गतीने ट्रेन निघाली. कृषी उत्पन्न बाजार समितीजवळ मोठे वळण असल्याने गती आणखी कमी करण्यात आली. यामुळे मोठा अपघात टळला. ही मालगाडी चवथ्या लाईनने जात असल्याने अप-डाऊन यामुख्य लाईनवर कोणताही परिणाम झाला नाही. कोरोनामुळे रेल्वेगाड्यांचे आवागमन बंद असल्याने मोठा अनर्थ टळला. रेल्वे विभागाने युद्धस्तरावर दुरुस्तीच्या कामाला पावसातही सुरुवात करण्यात आली. 22 डब्ब्यांच्या या रेल्वेतील अपघात झालेले दोन डब्बे बाजूला ठेवूनच पार्सल व्हॅन पुढे जाऊ शकणार असल्याचे सांगण्यात आले. हा अपघात पटरीमुळेच झाला असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button