ताज्या घडामोडीमुंबई

#loadshedding: ऐन उन्हाळ्यात डोंबिवलीकरांची दैना; ६ तासांचं लोडशेडिंग

डोंबिवली |  गेल्या काही दिवसांपासून वीजेच्या भार नियमनामुळे हैराण झालेल्या डोंबिवलीकरांसाठी आजचा दिवस कष्टप्रद ठरण्याची शक्यता आहे. कारण, शुक्रवारी डोंबिवलीत तब्बल सहा तासांचे लोडशेडिंग होणार आहे. पावसाळ्यापूर्वीची वीज वाहिन्या देखभाल, दुरुस्तीची कामे करण्यासाठी डोंबिवली पूर्व, पश्चिम भागाचा वीज पुरवठा शुक्रवारी सकाळी ६ ते दुपारी १२ वाजेपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे आज सकाळपासूनच डोंबिवली परिसरातील वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे. परिणामी पहाटेपासूनच डोंबिवलीकरांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

डोंबिवलीतील १२ संचयकांवरचा (फिडर) वीज पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. डोंबिवली पूर्वेतील सावरकर रोड, तुकारामनगर, पी ॲन्ड टी कॉलनी, नांदिवली, पांडुरंगवाडी, आगरकर रस्ता,टिळकनगर,चार रस्ता आणि डोंबिवली पश्चिमेतील नवापाडा, गरीबाचापाडा, जय हिंद कॉलनी, गुप्ते रस्ता, शास्त्रीनगर संचयकांवरून पुरवठा होणाऱ्या भागात वीज नसेल.

तुकारामनगर भागातील नवचेतन संकुल, लक्ष्मण रेषा, आयरे रस्ता, सुदाम वाडी, पाटकर शाळा, नांदिवली भागातील टिळकनगर, चार रस्ता, सावरकर नगर, टिळक रस्ता, नांदिवली मठ, सुनील नगर, नांदिवली रस्ता, पांडुरंगवाडी भागातील संगीतावाडी, श्रीखंडेवाडी, एकता नगर, डीएनसी शाळा, गोपाळबाग, आगरकर रस्ता भागातील आगरकर रस्ता, रेल्वे स्थानक रस्ता, नेहरू मैदान, सर्वेश सभागृह, ताई पिंगळे चौक, ब्राम्हण सभा, पी ॲन्ड टी भागातील स्वामी समर्थ मठ, हनुमान मंदिर या भागात. तर डोंबिवली पश्चिमेतील शास्त्रीनगर परिसरातील कोपर गाव, कोपर रस्ता, शास्त्रीनगर, जुनी डोंबिवली, ठाकुरवाडी, समर्थ चौक, पी. डी. रस्ता, फुले नगर, महात्मा गांधी रस्ता, अण्णा नगर, सिध्दार्थनगर. नवापाडा भागातील गणेशनगर, चिंचोलीपाडा, कुंभारखाणपाडा, राजू नगर, गणेशघाट, ठाकुर्ली, शंकेश्वर पाम, वृंदावन कॉलनी, गंगेश्वर कृपा, गरीबाचापाडा भागातील जलकुंभ, महाराष्ट्रनगर, श्रीधर म्हात्रे चौक, सरोवरनगर, जयहिंद कॉलनी भागातील जोशीवाडी, मॉडेल शाळा, गोपी मॉल, रोकडे इमारत, वेलंकणी शाळा, डॉन बॉस्को शाळा, गुप्ते रस्ता भागातील जाधववाडी, रेल्वे स्थानक भाग, रमेशनगर, महात्मा फुले रस्ता, आननंदनगर भागातील वीज पुरवठा बंद राहणार असल्याची माहिती महावितरणकडून देण्यात आली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button