breaking-newsताज्या घडामोडीपुणेराजकारण

कसबा मतदारसंघातील मोफत आरोग्य तपासणी शिबिरास नागरिकांचा उस्फुर्त प्रतिसाद

हेमंत रासने यांच्या संकल्पनेतून आयोजित आरोग्य शिबिराचा हजारो नागरिकांना लाभ

पुणे : कसबा विधनासभा मतदारसंघात पंतप्रधान मा. श्री. नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पक्षाकडून आयोजित मोफत आरोग्य तपासणी शिबिरात जवळपास ४८०० नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. गेली दहा दिवसांपासून मतदारसंघात समाविष्ट सर्व प्रभागांमध्ये या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. नवरात्रीचा सण सुरु असताना देखील मोठ्या संख्येने महिलांनी सहभाग नोंदवत आपली आरोग्य तपासणी करून घेतली.

पंतप्रधान मा.श्री. नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री मा.श्री. चंद्रकांतदादा पाटील व समर्थ युवा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने मतदारसंघाचे निवडणूक प्रमुख हेमंत रासने यांच्या संकल्पनेतून आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. रक्तातील साखर (ब्लड शुगर), रक्तदाब (बी.पी.), छातीचा एक्स-रे, रक्त तपासणी (सीबीसी टेस्ट), कोलेस्ट्रॉल तपासणी, स्तनाचा कर्करोग तपासणी (मॅमोग्राफी) आदी तब्बल ९५०० रुपये पर्यंतच्या तपासण्या मोफत करण्यात आल्या. कसबा मतदारसंघात असणाऱ्या सर्व सहा प्रभागांमध्ये विविध ठिकाणी नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून आज यशस्वी समारोप करण्यात आला.

हेही वाचा – नारायण राणेंच्या ‘त्या’ विधानावर मनोज जरांगेंचं प्रत्युत्तर; म्हणाले.. 

यावेळी बोलताना हेमंत रासने म्हणाले, आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये आपण आरोग्याच्या समस्यांकडे दुर्लक्ष करतो, पंरतु कालांतराने याचे गंभीर परिणाम आपल्यासह कुटुंबाला सहन करावे लागतात. त्यामुळे योग्य वेळी आरोग्य तपासणी करून घेणे अत्यंत महत्वाचे आहे. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी देशातील नागरिकांचे आरोग्य चांगले रहावे, त्यांना योग्य ते उपचार मिळवण्यासाठी अनेक योजना राबवल्या असून हाच विचार पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. या शिबिराच्या माध्यमातून नागरिकांची विविध आजाराची मोफत तपासणी करण्यात आली असून त्यांना काही आजार असल्यास पुढील उपचारासाठी मार्गदर्शन व सर्वतोपरी मदत केली जाणार आहे. शिबिरासाठी परिश्रम घेणारे सर्व डॉक्टर्स, इतर कर्मचारी, भाजपाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे मनापासून धन्यवाद.

हे शिबीर यशस्वी करण्यासाठी कसबा मतदारसंघाचे अध्यक्ष राजेंद्र काकडे,सरचिटणीस छगन बुलाखे, सहसंयोजक वैद्यकीय आघाडी महाराष्ट्र प्रदेश अनिल बेलकर, राणी ताई कांबळे,नगरसेवक योगेश समेळ, गायत्री खडके, राजेश येनपूरे, अजय खेडेकर, विजयालक्षमी हरिहर, मनीषाताई लडकत, सम्राट थोरात, सौ. आरती कोंढरे, बापू मानकर, सौ. स्वरदा बापट, सौ. सुलोचना कोंढरे, नामदेव माळवदे, प्रमोद कोंढरे, सौ.रेश्मा सय्यद, तुषार पाटील, उदय लेले, सुनिल खंडाळे, अर्चना पाटील, शहर कार्यालय मंत्री संजयमामा देशमुख, युवा मोर्चा अध्यक्ष अमित कंक, प्रभाग अध्यक्ष किरण जगदाळे, संदिप इंगळे, सागर शिंदे, रमेश जगताप, उमेश दुरंडे तसेच विष्णू अप्पा हरिहर, चंद्रकांत पोटे, जयदिप शिंदे, निलेश कदम, राजू परदेशी, बाप्पू नाईक, सनी पवार, माधव साळुंखे, संकेत थोपटे, परेश मेहेंदळे, बिपीन बोरावके, तांबोळीताई माधुरी सकपाळ, अर्जुन खानापुरे, प्रदीप रणदिवे,सचिन ससाणे,दिपाली मारटकर, उमेश अण्णा चव्हाण, प्रणव गंजीवाले, तुषार रायकर, निर्मल हरिहर, राहुल हरिहर, संतोष फडताळे, यतिश रासने आदींनी परिश्रम घेतले.

दररोजच्या कामातून वेळ काढून आरोग्य तपासणी करणे शक्य होत नाही. एक तपासणी करायची म्हंटले तरी हजारो रुपये लागतात, त्यामुळे देखील आजवर कधी आवर्जून आरोग्य तपासणी केली नाही. श्री. हेमंतभाऊ रासने यांनी आमच्या घराजवळच या शिबीरचे आयोजन केल्याने सर्व चाचण्या करून घेतल्या. माझ्यासह आमच्या कुटुंबातील सर्वांची येथे तपासणी करण्यात आली, याबद्दल हेमंतभाऊंचे आभार.

स्थानिक नागरिक

माझ्या सारख्या रिक्षावाल्याला साधं दवाखान्यात जाऊन शंभर -दोनशे रुपयांची बीपी आणि शुगर चेक करायला सुद्धा परवडत नाही. एक्स-रे वगैरे तर लांबची गोष्ट आहे. पण आज हेमंत भाऊ रासने यांनी आमच्या सारख्या गरिबांसाठी ही मोफत आरोग्य तपासणी उपलब्ध करून दिल्याबद्दल खरचं मनापासून त्यांचा आभार मानतो. हेमंत भाऊ नेहमीच आमच्या अडीअडचणीत सोबत असतात.

रिक्षा चालक

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button