breaking-newsTOP NewsUncategorizedताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडराजकारण

विधान परिषद निवडणुक : भाजपा आमदार लक्ष्मण जगताप रूग्णवाहिकेने मुंबईकडे रवाना

पिंपरी: चिंचवड विधानसभेचे भाजपाचे आमदार लक्ष्मण जगताप आजारी असतानाही देखील आज (सोमवार दि.२०) विधान परिषदेच्या मतदान प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी निघाले आहेत. पिंपळे गुरव येथील त्यांच्या निवासस्थानातून सकाळी १०.४० वाजता ते रूग्णवाहिकेने मुंबईकडे रवाना झालेत. आमदार जगताप यांनी राज्यसभेच्या निवडणुकीत देखील सहभागी होऊन मतदानाचा हक्क बजावला होता.

आमदार जगताप यांचे बंधू माजी नगरसेवक शंकर जगताप म्हणाले की, चंद्रकांत पाटील आणि देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष्मण जगताप यांच्याशी संपर्क साधला. ते म्हणाले लक्ष्मणभाऊ तुम्ही फार मोठी कामगिरी बजावलीये राज्यसभेला, आता उद्या नाही आलात तरी चालेल, प्रकृती महत्वाची आहे, तुम्ही विश्रांती घ्या. यावर लक्ष्मण जगताप यांनी पक्षाला माझी गरज असून, मी प्रवास करु शकतो असं सांगितलं. तसंच निवडणुकीत सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे.

सोमवारी अर्थात २० जून रोजी होणाऱ्या विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापलं आहे. शिवसेना, भाजपा, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या चारही पक्षांनी आजच्या निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. विधानपरिषद निवडणुकीत १० जागांसाठी ११ उमेदवार रिंगणात आहेत. काँग्रेसने दुसरा उमेदवार मागे न घेतल्याने महाविकास आघाडी विरुद्ध भाजप हा चुरशीचा सामना रंगला आहे. विधानपरिषदेत भाजपने पाच तर महाविकास आघाडीने सहा उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. पण, अतिरिक्त उमेदवाराला जिंकून आणण्यासाठी दोन्ही पक्षांकडे पूरेसं संख्याबळ नाही.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button