breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

विजय मल्ल्याची संपत्ती जप्त करण्याचे आदेश…

नवी दिल्ली – नऊ हजार कोटी रुपयांचे कर्ज बुडवून देशाबाहेर फरार झालेला उद्योगपती विजय मल्ला याची मनी लॉंड्रींग केल्याप्रकरणी संपत्ती जप्त करण्याचा आदेश दिल्ली न्यायालयाने दिला आहे. हा निर्णय विजय मल्ल्यासाठी अत्यंत धक्‍कादायक असा मानला जात आहे.

विजय मल्ल्यावर विदेशी मुद्रा कायद्यांतर्गत (फेरा) मनी लॉंड्रींगप्रकरणी दाखल असलेल्या प्रकरणावर दिल्ली न्यायालयात आज सुनावणी झाली. या सुनावणीवेळी ईडीचे विशेष अभियोक्‍ता एन. के. मट्टा यांनी विजय मल्ला याची संपत्ती जप्त करण्याचे अद्याप कोणतेही निर्देश मिळाले नसल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणुन दिले. त्यानंतर न्यायाधिश दिपक शेरावर यांनी मल्ल्याची संपत्ती जप्त करण्याचे आदेश दिले. न्यायालयाने मट्टा यांच्या युक्तीवादानंतर याचीकेवरील पुढील सुनावणी 5 जुलै रोजी निश्‍चित केली.

दरम्यान, न्यायालयाने 27 मार्च रोजी बंगळुरू पोलिसांना संपत्ती जप्त करण्याचे आदेश दिले होते. तसेच या आदेशाच्या अंमलबजावणीचा एक अहवाल मंगळवारी सादर करण्यास सांगितले होते. याबाबत ईडीने मल्ल्याची संपत्ती जप्त करण्याची मागणी केल्यानंतर न्यायालयाने हे आदेश दिले होते. मात्र, त्यानंतर वारंवार समन्स बजावूनही तो न्यायालयात हजर न झाल्याने 4 जानेवारी रोजी मल्लाला फरार घोषीत करण्यात आले होते.

भारतीय बॅंकांचा दावा वैध 
मद्य सम्राट विजय मल्ल्या याला युकेच्या न्यायाधीशांनी आणखी एक दणका दिला आहे. भारतीय बॅंकांचा दीड अब्ज डॉलर्सचा दावा वैध ठरवला आहे. या निर्णयामुळे विजय मल्ल्याला दर आठवड्याला 20 हजार पाऊंड्‌सच बॅंकेतून काढता येणार आहेत. विजय मल्ल्याने मोठा घोटाळा केला आहे, हे या बॅंकांनी स्पष्ट केले होतेच. हा दावा वैध ठरवल्याने विजय मल्ल्यासाठी हा मोठा झटका आहे, यात शंका नाही. या निर्णयानंतर विजय मल्ल्याच्या वकिलांनी कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया दिलेली नाही. अँड्रूयू हेन्शा यांनी आपल्या निर्णयाविरोधात अपिल करण्यासही संमती दिलेली नाही. यामुळे विजय मल्ल्या यांच्या वकिलांना आता थेट न्यायालयात याचिकाच दाखल करावी लागण्याची शक्‍यता आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button