Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड
वाकडमध्ये खुली जलद बुद्धिबळ स्पर्धा संपन्न; २५० पेक्षा अधिक बुद्धिबळपटू स्पर्धेत सहभागी

चिंचवड : दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या जन्मदिनानिमित्त रणजित आबा कलाटे फाउंडेशन आणि विश्व विजय चेस अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने वाकड येथे एकदिवसीय वयोगट व खुली जलद बुद्धिबळ स्पर्धा झाली. ऐश्वर्या जगताप-रेणुसे यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन झाले. रणजित आबा कलाटे फाउंडेशनच्या अध्यक्षा स्नेहा कलाटे, रणजित कलाटे यांच्या हस्ते यशस्वी खेळाडूंना सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्रक गौरविण्यात आले.
वाकड, पिंपळे निलख, जगताप डेअरी परिसरातील २५० हून अधिक बुद्धिबळपटूंनी स्पर्धेत सहभाग घेतला होता. त्यापैकी विविध वयोगटांतील १९ खेळाडूंनी यश मिळवले. या स्पर्धेत सूर्यांश देशमुख, वीर पाटील, अधिराज सिंह, शराव बोडके, आदिती खेडकर, कुणाल काटे आदींनी यश मिळवले.
महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा