ताज्या घडामोडी
३८९ द्या अन् मिळवा भाड्याने बॉयफ्रेंड; ‘व्हॅलेंटाईन डे’ निमित्त बेंगळुरूमध्ये अजब ऑफर!

Valentine Day | व्हॅलेंटाईन डे निमित्त बेंगळुरूमध्ये असे काही पोस्टर्स लागले आहेत, ज्यांनी लोकांना आश्चर्यचकित केलं आहे. एक बॉयफ्रेंडला भाड्याने घ्या असं या पोस्टर्सवर लिहिले आहे. तसंच, एक QR कोड देखील देण्यात आला आहे. ₹३८९ मध्ये एका दिवसासाठी भाड्याने देण्याची ऑफर देण्यात आली आहे, ज्यामुळे पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.
हेही वाचा : सोमवारी हिंजवडी येथे दिव्यांग रोजगार मेळाव्याचे आयोजन
बेंगळुरूमधील जयनगर आणि बनशंकरी भागात भिंतींवर हे पोस्टर्स चिकटवलेले दिसले. पोस्टर्सवर लिहिले होते, बॉयफ्रेंड भाड्याने मिळवा फक्त ₹३८९ मध्ये. तसंच, येथील कोड स्कॅन करा. याचा अर्थ असा की फक्त ₹३८९ मध्ये एका दिवसासाठी बॉयफ्रेंड भाड्याने घेता येतो. जयनगर आणि बनशंकरी बीडीए कॉम्प्लेक्सच्या ८ व्या ब्लॉकजवळ हे पोस्टर्स दिसले आहेत.