ताज्या घडामोडीराष्ट्रिय

आता लग्नाच्या वऱ्हाडींना घेऊन जाण्यासाठी संपूर्ण ट्रेन आरक्षित करता येणार, आयआरसीटीसीची सुविधा

नवी दिल्ली | आता भारतीय रेल्वेने लग्नाच्या वऱ्हाडी मंडळींना घेऊन जाण्यासाठी स्पेशल ट्रेनची असलेली सुविधा सुलभ केली आहे. आता अशी ट्रेन आयआरसीटीसी वेबसाइटवरूनही बुक करता येणार आहे. मात्र या गाडीच्या प्रत्येक तिकिटावर ३० टक्के जास्त पैसे द्यावे लागणार आहेत. त्याचप्रमाणे त्यासाठी विशिष्ट रक्कम एकरकमी जमा करावी लागणार आहे.

या विशेष ट्रेनसाठी लग्नासाठीचा प्रवास पूर्ण झाल्यावर ही जमा केलेली विशिष्ट रक्कम रेल्वेकडून परत मिळणार आहे. तसेच या स्पेशल ट्रेनमधील कोचच्या संख्येच्या मागणीनुसार शुल्क भरावे लागणार आहे. त्यामध्ये एका कोचसाठी ५० हजार रुपये तर १८ डब्यांच्या ट्रेनसाठी १ लाख रुपये जमा करावे लागतील. त्यामध्ये याशिवाय अनेक करही लावले जातील. ही ट्रेन बुक करताना आधार कार्ड, पॅन क्रमांक, मोबाईल क्रमांक आणि फोटो जोडणे आवश्यक असणार आहे. अशा प्रकारे सर्व प्रक्रिया पूर्ण करूनच वऱ्हाडी मंडळींना ट्रेनस्वारी करत लग्नाच्या ठिकाणी पोहोचता येणार आहे. यासाठी तुम्हाला आधी बुकिंग करावे लागणार आहे

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button