नैतिकतेवरून मुंडे राजीनामा का देत नाहीत? अजित पवार म्हणाले, धनंजय मुंडेंनाच विचारा..

मुंबई | बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंचं सतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणवारुन राज्याचे अन्न-नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर विरोधकांकडून गंभीर आरोप केले जात आहेत. नैतिकतेच्या दृष्टीने धनंजय मुंडे यांनी राजीनााम द्यावा, अशी मागणी विरोधकांनी केली आहे. याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विचारले असता त्यांनी धनंजय मुंडेंनाच प्रश्न विचारा असं म्हटलं आहे.
आर. आर. पाटील आणि विलासरावांनी राजीनामा दिला होता. मग ही नैतिकता धनंजय मुंडे का दाखवत नाहीत? असा प्रश्न पत्रकारांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विचारला. यावर अजित पवार म्हणाले, आपण त्यांनाच प्रश्न विचारा. तुमच्या आमच्या पक्षाचं असं काही नसतं. तेही काही गोष्टी बघत असतील ना. त्यांचं म्हणणं आहे की माझा दुरान्वयेही संबंध नाही, असं अजित पवार म्हणाले.
हेही वाचा : ‘महाकुंभ फालतू आहे, त्याला काहीही अर्थ नाही’; लालू प्रसाद यादव यांचं वादग्रस्त विधान
दरम्यान, अजित पवार यांच्या या वक्तव्यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. धनंजय मुंडेनी राजीनामा द्यायचा की नाही यापेक्षा कोणी घ्यायचा हे ठरवलं पाहिजे. अजित पवारांनी घ्यायचा की देवेंद्र फडणवीसांनी घ्यायचा, हे ठरलं पाहिजे, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.