रविवारी रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक

मध्य रेल्वेच्या तीनही मार्गावर १३ ऑक्टोबरला मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या माटुंगा ते मुलुंड डाऊन जलद मार्ग, हार्बरवरील वडाळा रोड ते वाशी दोन्ही मार्गावर आणि पश्चिम रेल्वेच्या सांताक्रूझ ते गोरेगाव दरम्यान दोन्ही धिम्या मार्गावर ब्लॉक असेल. या दिवशी उपनगरी रेल्वे उशिराने धावतील.
मध्य रेल्वे-मुख्य मार्ग
* कुठे – माटुंगा ते मुलुंड डाऊन जलद मार्ग
* कधी – स. १०.३० ते दु. ३.०० वा
* परिणाम – कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या जलद उपनगरी रेल्वे माटुंगा ते मुलुंड दरम्यान डाऊन धिम्या मार्गावरून धावतील. त्यानंतर पुन्हा जलद मार्गावर गाडय़ा वळवण्यात येतील. ठाणे स्थानकानंतर सीएसएमटीच्या दिशेने जाणाऱ्या जलद उपनगरी रेल्वेंना मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला स्थानकात थांबा देण्यात आला आहे. लोकल १५ ते २० मिनिटे उशिराने धावतील.
पश्चिम रेल्वे
* कुठे – सांताक्रूझ ते गोरेगाव दरम्यान दोन्ही धिम्या मार्गावर
* कधी – स. १०.३५ ते दु. ३.३५ वा
* परिणाम – ब्लॉकवेळी सांताक्रूझ ते गोरेगाव दरम्यान धिम्या मार्गावरील उपनगरी रेल्वे जलद मार्गावर वळवण्यात येणार आहेत. राम मंदिर स्थानकात मात्र लोकल थांबणार नाहीत.
हार्बर मार्ग
* कुठे – वडाळा रोड ते वाशी दोन्ही मार्गावर
* कधी – स. ११.१० ते दु. ३.४० वा ’ परिणाम – सीएसएमटी ते वाशी, बेलापूर, पनवेल दरम्यानच्या दोन्ही मार्गावरील उपनगरी रेल्वे फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. पनवेल ते वाशी ते पनवेल दरम्यान विशेष उपनगरी रेल्वे धावतील.





