Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मुंबईकरांना सावधान! अत्यावश्यक असेल तरच घराबाहेर पडा, हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी

Mumbai Rain News :  राज्यातील बहुतांश भागात पावसाचा जोर वाढल्याचं (intensity of the rain increased.)  चित्र पाहायला मिळत आहे. विशेषत: मुंबईसह ठाणे पालघर आणि कोकणातही जोरदार पाऊस (Rain) पडत आहे. त्याचबरोबर विदर्भातील काही भागात देखील चांगला पाऊस पडत आहे. अशातच आता भारतीय हवामान खात्यानं (India Meteorological Department) मुंबईतील पावससासंदर्भात महत्वाची माहिती दिली आहे. बृहन्मुंबई क्षेत्रात उद्या, रविवार, दिनांक 5 जुलै 2026 रोजी अतिवृष्टीचा (Red Alert) इशारा हवामान विभागानं दिला आहे. नागरिकांनी सतर्क राहावे आणि अत्यावश्यक असेल तरच घराबाहेर पडावे असं आवाहन महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.

भारतीय हवामान खात्याने (IMD) बृहन्मुंबई क्षेत्रात उद्या, रविवार, दिनांक 5 जुलै 2026 रोजी अतिवृष्टीचा (Red Alert) इशारा दिला आहे. या दरम्यान, मुसळधार ते अति मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आयएमडीने वर्तविली आहे. तसेच, उद्या दुपारी 3.22 वाजता समुद्राला 4.19 मीटर उंचीची भरती आहे. या पार्श्वभूमीवर, नागरिकांनी सतर्क राहावे आणि अत्यावश्यक असेल तरच घराबाहेर पडावे. तसेच, प्रशासनाकडून वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे. आपत्कालीन परिस्थितीत तत्काळ मदतीसाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या 1916 या मदतसेवा क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

हेही वाचा –  पंढरपूर येथे मंचर ग्रामस्थ वारकरी सेवा मंडळाच्या भक्तनिवासाचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते लोकार्पण

मुंबईसह ठाणे, रायगड, पालघरमध्ये मुसळधार पाऊस सुरु

मुंबईसह ठाणे, रायगड, पालघर असेल पुण्याचा काही भाग, नाशिक याठिकाणी मुसळधार पाऊस आहे. कालपासून आपण वेगवेगळे अलर्ट दिले आहेत. या भागात सातत्याने 6 जुलैपर्यंत मुसळधार  पाऊस असेल, वादळंही येतील. तसेच या भागात सरासरीपेक्षा जास्त पाऊस होईल, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.  आपण दर तीन तासांनी आपण या भागातील नागिरकांना एसएमएस पाठवत आहोत. शाळांना सुट्टी दिली आहे. लोकांन विनंती केली आहे की, प्रवास टाळता आला तर टाळला पाहिजे, गरज असेल तरच घराबाहेर पडा. आता ज्याप्रकारे पाऊस आणि वादळ आहे काही अपघात होऊ नयेत म्हणून प्रशासनाकडून अलर्ट  पाठवले जात आहेत. एनडीआरएफ आणि एसडीआरएफ परिस्थितीवर नजर ठेवून आहेत. माझी लोकांना विनंती आहे की,  आपण नीट अलर्ट देतोय , लोकांनी ते अलर्ट फॉलो करावेत, शक्यतो त्याप्रमाणे बाहेर पडावे, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button