मुकेश अंबानी यांचे ICT सोबत वेगळे नाते
मुंबईतील इंस्टीट्यूट ऑफ केमिकल टेक्नोलॉजीला (ICT) १५१ कोटी रुपयांची देणगी

राष्ट्रीय : देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी नेहमी चर्चेत असतात. आता मुकेश अंबानी यांनी दिलेल्या देणगीमुळे ते चर्चेत आले आहेत. मुंबईतील इंस्टीट्यूट ऑफ केमिकल टेक्नोलॉजीला (ICT) १५१ कोटी रुपयांची देणगी दिली आहे. मुकेश अंबानी यांनी १९७० च्या दशकात या कॉलेजमधून पदवी घेतली होती. त्यामुळे त्यांनी ‘गुरु दक्षिणा’ देऊन चांगले उदाहरण समोर ठेवले आहे.
मुकेश अंबानी एका कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांच्या आयसीटी कॉलेजमध्ये गेले. त्या ठिकाणी तीन तास ते थांबले. त्यांनी त्यांचे गुरु प्रोफेसर एम. एम. शर्मा यांची बायोग्राफी ‘डिवाइन सायटिस्ट’ च्या कार्यक्रमात सहभाग घेतला. यावेळी त्यांनी शर्मा सरांच्या लेक्चरच्या आठवणींना उजाळा दिला. ते म्हणाले, शर्मा सरांनी फक्त ज्ञानदानाचे काम केले नाही तर भारताच्या अर्थव्यवस्थेसाठी मोठे योगदान दिले. त्यांनी पॉलीसी मेकर्सला परमीट राज संपवण्याचा सल्ला दिला. त्यामुळे कंपन्यांना जागतिक पातळीवर काम करता आले.
हेही वाचा – ते तर 25 जागा जिंकू शकत नव्हते…त्यांनी राज्याच्या निवडणूक हायजॅक केली, राहुल गांधीनंतर राऊत सुद्धा आक्रमक
मुकेश अंबानी यांनी इंडियन केमिकल इंडस्ट्रीच्या विकासात शर्मा सरांच्या योगदानाबद्दल ‘राष्ट्र गुरु’ ची पदवी दिली. ते म्हणाले, शर्मा सरांच्या मार्गदर्शनामुळे फक्त माझ्या करिअरला आकार मिळाला नाही तर संपूर्ण इंडस्ट्रीला नवीन उंचीवर नेले. त्यामुळे शर्मा सरांच्या सल्ल्यानुसार आयसीटीला १५१ कोटींची देणगी दिली. ही रक्कम संस्थेच्या विकासात आणि संशोधनात वापरता येणार आहे.
मुकेश अंबानी आणि आयसीटी नाते
मुकेश अंबानी यांचा ICT सोबत वेगळे नाते आहे. १९७० च्या दशकात त्यांनी या संस्थेतून पदवी घेतली. त्यानंतर वडील धीरूभाई अंबानी सोबत रिलायन्स इंडस्ट्रीजला वेगळ्या उंचीवर नेले. रिलायन्स आज देशातील सर्वाधिक मूल्यांकन असणारी कंपनी झाली आहे. या कंपनीचा केमिकल आणि पेट्रोकेमिकल व्यवसाय जगभरात पसरला आहे. आयसीटीची स्थापना १९३३ मध्ये झाली होती. ते देशातील सर्वात प्रतिष्ठीत रासायनिक प्रौद्योगिकी आणि इंजीनियरिंग कॉलेज आहे. स्थापनेपासून आतापर्यंत या कॉलेजने शिक्षण, संशोधन आणि रसायन उद्योगात मोठे योगदान दिले आहे.