Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

लोहगड किल्ल्याजवळ दरड कोसळली; नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन

मावळ : पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील प्रसिद्ध लोहगड किल्ल्याजवळील भाजे गावाच्या उत्तर बाजूस शनिवारी (दि.७ जून) सायंकाळी सुमारे ५.३० वाजण्याच्या सुमारास दरड कोसळल्याची घटना घडली. सतत पडणाऱ्या पावसामुळे किल्ल्यालगतचा काही भाग कोसळला असला, तरी सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी किंवा वित्तहानी झाली नाही.

हेही वाचा – प्लास्टिक संकटाचे आव्हान मोठे; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून चिंता व्यक्त

लोहगड किल्ल्याच्या पायथ्याशी लोहगड आणि भाजे ही गावे वसलेली असून, या भागातील लोकसंख्या सुमारे ६५० च्या पुढे आहे. दरड कोसळल्याचा आवाज ऐकून नागरिकांनी तात्काळ आपत्ती व्यवस्थापन व महसूल विभागाला सूचना दिली. घटनेनंतर तहसीलदार, पोलीस पाटील, सरपंच व ग्रामसेवक यांनी घटनास्थळी पाहणी करून ग्रामस्थांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

लोहगड किल्ल्याच्या उत्तर बाजूला दरड कोसळल्याची घटना घडली असून मी स्वतः याबाबत माहिती घेतली आहे. कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाली नाही. मात्र नागरिकांनी आगामी पावसाळ्यात अधिक सतर्क राहणे आवश्यक आहे.

विक्रम देशमुख, तहसीलदार मावळ

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button