ताज्या घडामोडीविदर्भ विभाग

माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीत अजित पवारांचा विजय

विरोधी उमेदवाराचा सुपडा साफ, दादांना 101 पैकी 91 किती मते

बारामती : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीत ‘ब’ वर्गातुन दणदणीत विजय मिळवला आहे. त्यांच्या विजयानंतर माळेगावच्या सभासद आणि कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला आहे. माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी प्रशासकीय भवन बारामती येथे मतमोजणी पार पडत आहे. या मध्ये ब वर्ग प्रतिनिधीची मतमोजणी प्रारंभी झाली ज्यात उपमुख्यमंत्री अजित पवार हे उमेदवार होते. प्रथम ब वर्गासाठी मतमोजणी झाली. या वर्गात 99 टक्के मतदान झाले होते. अपेक्षेप्रमाणे सर्व संस्थावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे वर्चस्व असल्यामुळे त्यांना 101 त्यापैकी तब्बल 91 एवढी मते पडली तर विरोधी सहकार बचाव पॅनलच्या उमेदवारांना 10 एवढीच मते मिळाली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा दणदणीत विजय झाल्याने सभासद व कार्यकर्ते यांनी आनंदोत्सव साजरा केला.

माळेगावच्या निवडणूकीत निलकंठेश्वर, सहकार बचाव या पॅनेलसह राष्ट्रवादीच्या शरदचंद्र पवार गटाचा बळीराजा सहकार बचाव पॅनेल, शेतकरी कष्टकरी समितीचा पॅनेल रिंगणात आहेत. निवडणूकीत एकमेकांवर मोठे आरोप झाले. परंतु त्यात दोन्ही पवारांनी एकमेकांवर आरोप करणे टाळले. उपमुख्यमंत्री अजित पवार व तावरे यांच्यात मोठी जुगलबंदी रंगली. अनेक आरोप-प्रत्यारोप झाले.

हेही वाचा –  माटे हायस्कूलमध्ये योग दिन उत्साहात साजरा

आमच्या पॅनेलचा मीच चेअरमन असेल, तुम्ही चेअरमन पदाचा उमेदवार जाहीर करा असे खुले आव्हान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधकांना दिले. सहकार बचावने ज्येष्ठ सहकार तज्ज्ञ चंद्रराव तावरे हे आमचे चेअरमन असतील असे सांगत पवार यांना जोरदार प्रत्युत्तर दिले. मतदान हे बॅलेट पेपरवर असल्याने आता निकालाला रंगत येणार आहे.

राज्यभर बारामतीमधील माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीकडे सर्वांचं लक्ष लागलेले आहे. या निवडणुकीमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार स्वत: उतरले होते. त्यामुळे त्यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची मानली जात होती. आज मतमोजणी प्रक्रिया प्रक्रिया पार पडत आहे. तर ‘ब’ वर्गातून अजित पवार विजयी झाले आहेत.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button