ताज्या घडामोडीपुणे

पुण्यात अजित पवारांचा डबल धमाका

ठाकरेंसह काकांच्या पक्षाला जबर धक्का

पुणे : आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. हडपसर विधानसभा मतदारसंघात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पकड मजबूत केली आहे. हडपसर विधानसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानला जातो, तिथेच अजित पवारांच्या पक्षाने आपले वर्चस्व अधिक दृढ करण्यासाठी रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे.

हडपसर विधानसभा मतदारसंघाने मागील अनेक महापालिका निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला भक्कम पाठबळ दिला आहे. 2017 च्या महापालिका निवडणुकीत या मतदारसंघातून एकसंध राष्ट्रवादीच्या तब्बल 17 ते 18 नगरसेवकांनी विजय मिळवला होता, जे इतर विधानसभा मतदारसंघांपेक्षा सर्वाधिक होते. यापूर्वीच्या निवडणुकांमध्येही हडपसरमधून राष्ट्रवादीचे नगरसेवक सातत्याने मोठ्या संख्येने निवडून आले आहेत. 2019 मध्ये राष्ट्रवादी एकसंध असताना या मतदारसंघातून चेतन तुपे यांनी विधानसभा निवडणुकीत बाजी मारली होती. पक्षफुटीनंतरही अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीने हडपसरवर आपली पकड कायम ठेवली आणि चेतन तुपे यांनी पुन्हा एकदा विजय मिळवला.

हेही वाचा –  माटे हायस्कूलमध्ये योग दिन उत्साहात साजरा

आता आगामी महापालिका निवडणुकीच्या तयारीसाठी अजित पवार यांनी हडपसरमधील आपला गड अधिक मजबूत करण्यासाठी पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. याच रणनीतीचा भाग म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) मधील दोन माजी उपमहापौर आणि एक माजी नगरसेवक अजित पवार यांच्या पक्षात सामील होणार आहेत. माजी उपमहापौर निलेश मगर आणि माजी उपमहापौर बंडू तात्या गायकवाड, तसेच माजी नगरसेवक योगेश ससाने यांचा आज अजित पवार यांच्या पक्षात प्रवेश होणार आहे. हा शरद पवार गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे.

विशेष म्हणजे, हडपसर विधानसभा मतदारसंघातूनच राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) चे शहराध्यक्ष प्रशांत जगताप येतात. गेल्या विधानसभा निवडणुकीत प्रशांत जगताप यांचा हडपसर विधानसभा मतदारसंघातून थोड्या मताने पराभव झाला होता. आता त्यांच्याच मतदारसंघातील प्रमुख नेत्यांना अजित पवार यांनी आपल्या गटात सामील करून घेतल्याने हा शहराध्यक्षांसाठीही मोठा धक्का मानला जात आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button