माटे हायस्कूलमध्ये योग दिन उत्साहात साजरा
शिक्षण विश्व: विद्यार्थ्यांनी जाणून घेतले योगाचे महत्त्व

पिंपरी चिंचवड : जागतिक योग दिनानिमित्त व्ही के माटे हायस्कूल चिंचवडमध्ये योग प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून योगांजली स्टुडिओच्या संस्थापिका व संचालिका अंजली खोकले तसेच योग शिक्षिका संमेल साताळकर, अवंतिका पाटील होत्या. त्यांनी योगाचे आपल्या मानवी आयुष्यात तील स्थान आणि महत्त्व पार्श्वभूमी याबद्दल माहिती दिली. मोरया शिक्षण संस्थेच्या कार्यवाह तथा प्राचार्य इंद्रायणी माटे पिसोळकर यांनी कार्यक्रमाच्या प्रास्ताविकेत योग दिन संकल्पना -एक पृथ्वी एक आरोग्य – याचा अर्थ स्पष्ट करून सांगितला.तसेच मनाला आणि शरीराला शांतता देण्याचा दिवस म्हणजे 21 जून योग दिन या निमित्ताने शाळेचे आणि संस्थेचे यावर्षीची थीम संवर्धन वर्ष म्हणून साजरा करण्यात येत असल्याचे जाहीर केले.
हेही वाचा – चिंचवड मध्ये विद्यार्थ्यांनी अनुभवली “स्वच्छता वारी”
या संकल्पने अंतर्गत नाते संवर्धन ,आरोग्य संवर्धन, पर्यावरण संवर्धन, जलसंवर्धन ,याबद्दलही त्यांनी सविस्तर माहिती विद्यार्थी आणि शिक्षकांना दिली. माजी विद्यार्थ्यांनी विद्या गवस, अंजली खोकले आणि योग शिक्षिका मीनल साताळकर, जयश्री दाभाडे यांनी इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांकडून व शिक्षकांकडून योग प्रात्यक्षिके करवून घेतली.
या कार्यक्रमात मोठ्या संख्येने विद्यार्थी व शिक्षक सहभागी झाले होते . कार्यक्रमाला उपमुख्याध्यापक दिलीप कुमावत पर्यवेक्षिका मैत्रेयी राजे उपस्थित होते.पाहुण्यांचा परिचय अनिता बोरसे, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हनुमंत हुचगोळ यांनी केले तर राजश्री अवचरे यांनी आभार मानले.