भारत-पाकिस्तानमध्ये तीन दिवस चाललेल्या सैन्य संघर्षात रशियाचा मोठा फायदा
भारताने अवघ्या तीन दिवसात पाकिस्तानला लोळवलं

आंतरराष्ट्रीय : युद्ध हे कुठल्यात समस्येच उत्तर नाही. पण काहीवेळा दीर्घकालीन शांततेसाठी युद्ध लढावं लागतं. युद्धामध्ये वित्तहानीबरोबर जिवीतहानी सुद्धा आहे. युद्ध लढणाऱ्या दोन्ही बाजूंच्या सैनिकांबरोबर अनेक निरपराध मारले जातात. त्यामुळे युद्धाचा कधीच समर्थन होऊ शकत नाही. युद्धादरम्यान एकाबाजूला मानवी जीवनाच कधीच न भरुन येणारं नुकसान होतं. त्याचवेळी दुसऱ्याबाजूला व्यापार सुद्धा चालतो. युद्ध म्हणजे शौर्य, रणनिती आणि शस्त्र चालवण्याच कौशल्य. युद्धा दरम्यान कुठल्याही देशाकडून ताकत दाखवताना शस्त्रास्त्र प्रदर्शन होतं. जसं की भारताने पाकिस्तान सोबतच्या तीन दिवसाच्या लढाईत आपलं कौशल्य, क्षमता दाखवली.
भारताने अवघ्या तीन दिवसात पाकिस्तानला लोळवलं. पाकिस्तानची युद्ध लढण्याची जी खुमखुमी होती ती सर्व उतरवली. पाकिस्तानने विचारही केला नव्हता असा हवाई हल्ला पाकिस्तानवर चढवला. पाकिस्तानचे अनेक हवाई तळ उडवून दिले. भारताने 7 मे रोजी पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या तळावर एअर स्ट्राइक केले. त्यानंतर पाकिस्तानने पूर्ण तयारीनिशी भारतावर प्रतिहल्ला चढवला. एकाचवेळी शेकडो ड्रोन्स, मिसाइल्स डागले. पण एखाद-दुसरा अपवाद वगळता पाकिस्तानी ड्रोन्स, मिसाइल्स हवेतच नष्ट झाली. भारताने यातून आपलं आधुनिक युद्ध कौशल्य दाखवून दिलं.
हेही वाचा : पुण्यासह ‘या’ भागात कोसळधार पाऊस, राज्यात मुसळधार पावसासह गारपिटीचा इशारा
फायदा कसा?
भारताने पाकिस्तान विरोधात मोठा विजय मिळवला. पण यात सर्वात जास्त फायदा रशियाचा होणार आहे. कारण पाकिस्तानचे दोन मोठे हवाई हल्ले भारताने यशस्वीरित्या परतवून लावले, त्यात रशियाच्या S-400 आणि भारताच्या आकाश एअर डिफेन्स सिस्टिमने निर्णायक भूमिका बजावली. या दोन्ही शस्त्रांनी पाकिस्तानचे सगळे मनसुबे धुळीस मिळवले. महत्त्वाच म्हणजे हे सर्व लाइव्ह कॅमेऱ्यासमोर जगाने पाहिलं. S-400 आणि आकाशने आपलं नाण खणखणीत वाजवून दाखवलं. त्यामुळे भविष्यात जगभरातून S-400 आणि आकाश या दोन एअर डिफेन्स सिस्टिमची मागणी वाढणार आहे. S-400 ही एअर डिफेन्स सिस्टिम खूप महाग आहे. भारताने काही हजार कोटी रुपये खर्चून रशियाकडून ही हवाई सुरक्षा प्रणाली विकत घेतली होती. आज तीच निर्णायक ठरली आहे.