पुण्यासह ‘या’ भागात कोसळधार पाऊस, राज्यात मुसळधार पावसासह गारपिटीचा इशारा

Maharashtra Weather | राज्यात सतत अवकाळी पाऊस सुरू आहे. विदर्भ, मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत अवकाळी पाऊस पडला. हवामान विभागाने मुंबई-ठाण्यासह अनेक जिल्ह्यांत अलर्ट जारी केले आहे. मुंबई-ठाण्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यांत येलो आणि ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
मुंबई, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूरमध्ये पावसाची शक्यता आहे. तर गोंदिया, भंडारा, गडचिरोली, वर्धा, यवतमाळसाठी १४-१५ मे रोजी ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला आहे. तर काही भागात वादळी पाऊस आणि गारपिटीची शक्यता आहे. अनेक जिल्ह्यांवर ढगाळ वातावरणामुळे पारा एकदम खाली आला आहे.
हेही वाचा : महाराष्ट्राचे सुपुत्र न्यायमूर्ती भूषण रामकृष्ण गवई भारताचे ५२ वे सरन्यायाधीश
नैऋत्य मोसमी पावसाचा अंदमान-निकोबारमध्ये प्रवेश केला आहे. या ठिकाणी पुढील २४ तास अतिवृष्टीची शक्यता आहे. मान्सून २७ मे रोजी केरळमध्ये तर ६ जूनला महाराष्ट्रात दाखल होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. सकाळपासून मुंबई आणि उपनगरात ढगाळ वातावरण असून पुढील २४ तासाच्या आत काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. ६ जूनला मान्सून महाराष्ट्रात दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे (घाट विभागासह), नाशिक (घाट विभागासह), कोल्हापूर (घाट विभागासह), सातारा (घाट विभागासह), सांगली, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, बीड, लातूर, धाराशिव, अमरावती, अकोला, नागपूर, वर्धा, वाशीम, गोंदिया, गडचिरोली आणि भंडारा जिल्ह्यांत विजांचा कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’ दिला आहे.