दुबई हे जगभरातील अनेकांचे सर्वात आवडते हॉलिडे डेस्टिनेशन
दुबई सारख्या ड्रीम शहरात तुम्ही उंच इमारती, शॉपिंग मॉल्स, समुद्र, वाळवंट, ॲडवेंचर आकर्षण ठिकाणांला भेट द्या

दुबई : दुबई हे जगभरातील अनेकांचे सर्वात आवडते हॉलिडे डेस्टिनेशन आहे. येथे उंच इमारती, शॉपिंग मॉल्स, समुद्र, वाळवंट, ॲडवेंचर आणि बेटांसह अशी अनेक आकर्षण ठिकाणं आहेत. तर दुसरीकडे 19 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या ICC चॅम्पियन्स ट्रॉफीमधील भारताचे सर्व सामने दुबईमध्येच खेळवले जाणार आहेत. अशातच जर तुम्ही टीम इंडियाला सपोर्ट करण्यासाठी दुबईला जात असाल, तर दुबई सारख्या ड्रीम शहरात तुम्ही अशी अनेक ठिकाणं आहेत जी मस्त एक्सप्लोर करू शकता. तसेच या सुंदर ठिकाणी तुम्ही एकटे असाल किंवा तुमच्या जोडीदारासोबत तसेच मित्रांसोबत किंवा तुमच्या कुटुंबासोबत येथे फिरण्यासाठी अनेक ठिकाणं नक्कीच आहे. तर या लेखातून आम्ही तुम्हाला दुबईच्या संपूर्ण ट्रिपबद्दल सांगणार आहोत…
बुर्ज खलिफा
दुबईतील सर्वात प्रसिद्ध ठिकाण म्हणजे बुर्ज खलिफा, जी जगातील सर्वात उंच इमारत असल्याची नोंद झालेली आहे. तर या इमारतीची उंची सुमारे 828 मीटर आहे, ज्यामध्ये एकूण 160 मजले आहेत. तर या बुर्ज खलिफाच्या 124व्या आणि 148व्या मजल्यावर एक Observation Deck आहे, जिथून तुम्ही दुबई शहराचे 360 डिग्रीने संपूर्ण दृश्य पाहू शकता. तसेच तिथे एक नेत्रदीपक असा लाईट आणि संगीत शो देखील तुम्हाला पाहायला मिळेल.
दुबई मॉल
हा जगातील सर्वात मोठा शॉपिंग मॉल आहे. मॉलमध्ये एक्वैरियम, आइस-स्केटिंग पार्क, 100 फूड जॉइंट्स आणि इनडोअर थीम पार्क आहे. तसेच जो कोणी पर्यटक दुबईला येतो तो या मॉलला नक्की भेट देतो. त्यामुळे तुम्ही सुद्धा या मॉलला भेट द्या.
हेही वाचा : ‘महाकुंभ फालतू आहे, त्याला काहीही अर्थ नाही’; लालू प्रसाद यादव यांचं वादग्रस्त विधान
दुबई डेझर्ट सफारी
जर तुम्ही दुबईत असाल तर येथील डेझर्ट सफारीचा आनंद घ्यायला विसरू नका. दुबईत वाळूच्या ढिगाऱ्यावर सँडबोर्ड, जीप आणि जिप्सी तसेच उंट सफारीचा आनंद घेऊ शकता. दुबई मधील हा क्षण तुमच्यासाठी आयुष्यभर लक्षात राहणारा असेल. निश्चितच दुबईचे हे ठिकाण पर्यटनाचे ट्रम्पकार्ड आहे.
पाम जुमेरा
पाम जुमेरा हे एक कृत्रिम बेट आहे. हे ठिकाण लक्झरी रिसॉर्ट्स, हॉटेल्स आणि राहण्यासाठी प्रसिद्ध आहे. ‘Atlantis The Palm’ नावाचा एक रिसॉर्ट येथे आहे, जो भव्यता आणि सौंदर्यासाठी ओळखला जातो.
दुबईला कसे जायचे?
तुम्हाला दुबईला जाण्यासाठी फ्लाईटने जावे लागते. तुम्ही दुबईला जाण्यासाठी जर आधीच फ्लाइट बुक केली तर तुम्हाला रिटर्न तिकिटाचा खर्च 20,000 ते 35,000 रुपये होऊ शकतो. पण वेळेवर बुक न केल्यास तुमच्या खिशावर ताण पडू शकतो. तसेच भारतीय नागरिक म्हणून तुम्ही दुबईमध्ये व्हिसा-ऑन-अरायव्हल देखील घेऊ शकतात. तुमच्याकडे भारतीय पासपोर्ट आणि यूके किंवा यूएस व्हिसा असल्यास, तुम्ही दुबईला पोहोचल्यानंतर तुमचा व्हिसा मिळवू शकता. मात्र हे लक्षात ठेवा की, हा व्हिसा केवळ 2 आठवड्यांच्या कालावधीसाठी वैध असेल. व्हिसाची किंमत सरासरी १२० दिरहम भारतीय चलनानुसार अंदाजे 2100 आहे.