लोकरीचे उबदार कपडे नव्यासारखे दिसण्यासाठी काही गोष्टी ठेवा लक्षात
लोकरीचे कपडे पॅक करण्यापूर्वी ते नेहमी नीट धुवा, धुण्यासाठी लिक्विड डिटर्जंट वापरा.

पुणे : थंडीच्या मोसमात आपण उबदार कपडे घालतो. मात्र आता फेब्रुवारी महिना सुरू झाल्याने वातावरणातील गारवा कमी होऊ लागला आहे. त्यामुळे आता हळूहळू गरमी जाणवू लागली आहे. अशाने या गरमीच्या दिवसात अनेकजण कमी उबदार कपडे घालतात. अशातच अनेकजण स्वेटर, जॅकेट आणि कोट यांसारखे हिवाळ्यात थंडी पासुन बचाव करण्यासाठी बाहेर काढलेले उबदार कपडे पुन्हा पॅक करून कपाटात ठेऊ लागेलत. दरम्यान आपल्यापैकी अनेक महिला उबदार कपडे धुऊन वाळवून त्यानंतर त्यांना पॅक करून ठेवतात. मात्र कधी कधी या कपड्यांचे फॅब्रिक खराब होतात. त्यामुळे अनेक महिलांना असा प्रश्न पडतो की, कपडे नीट पॅक करून ठेवले तरी खराब कसे काय झाले?
तर जॅकेट, स्वेटर, शाल आणि मफलर यांसारखे लोकरीचे कपडे धुताना त्यांची चमक टिकवून ठेवण्यासाठी योग्य ती खबरदारी घेणे आवश्यक आहे, परंतु ते योग्यरित्या पॅक करणे आणि ठेवणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. हे कपडे व्यवस्थित पॅक केले तर ते बराच काळ चांगले राहतात आणि त्यांचे फॅब्रिकही सुरक्षित राहते. यासाठी आम्ही काही टिप्स सांगणार आहोत ज्याद्वारे तुम्ही तुमचे लोकरीचे कपडे व्यवस्थित पॅक करू शकता आणि ते सुरक्षित ठेवू शकता.
हेही वाचा : ‘महाकुंभ फालतू आहे, त्याला काहीही अर्थ नाही’; लालू प्रसाद यादव यांचं वादग्रस्त विधान
कपडे धुतल्यानंतर पॅक करा
लोकरीचे कपडे पॅक करण्यापूर्वी ते नेहमी नीट धुवा. तसेच तुम्ही जर लोकरीचे कपडे थोडे दमट असतानाच काढून पॅक केले तर त्यावर धूळ आणि दुर्गंधी साचू शकते, जे जास्त काळ ठेवल्यास फॅब्रिकचे नुकसान होते. लक्षात ठेवा की लोकरीचे कपडे खूप गरम पाण्याने धुतल्याने लोकर आकसते. त्यामुळे लोकरीचे कपडे धुण्यासाठी लिक्विड डिटर्जंट वापरा.
योग्य पध्दतीने कपडे सूकवा
लोकरीचे कपडे धुतल्यानंतर ते नीट वाळवणे फार महत्वाचे आहे. उबदार कपडे कधीही थेट सूर्यप्रकाशात वाळवू नयेत, कारण यामुळे लोकरीचा रंग फिका होऊ शकतो आणि फॅब्रिक आकसू शकते. अशावेळी जर खूपच कडक उन्ह असल्यास कपडे जास्त वेळ उन्हात ठेवू नयेत. याशिवाय कपड्यांवर सुती कापडही लावू शकता. ज्याने लोकर खराब होणार नाही.
मऊ आणि हलके कव्हर वापरा
अधिक महागडे कपड्यांची अधिकतर काळजी घेणे आवश्यक असते. लोकरीचे कपडे पॅक करताना मऊ आणि हलके कव्हर वापरा. प्लास्टिकच्या पिशव्या कधीही वापरू नका, कारण ते कपडे लवकर खराब करू शकतात. तुम्ही कॉटन किंवा तागाचे पिशव्या किंवा कव्हर वापरू शकता, ते कपड्यांसाठी योग्य असतात.
ते बरोबर ठेवा
कपडे पॅक करताना हे लक्षात ठेवा की लोकरीचे कपडे एकमेकांवर जास्त रचले जाऊ नयेत. जर तुम्ही त्यांना एका ठिकाणी ढीग केले तर ते कपडे दाबू शकतात आणि त्यांचा पोत खराब करू शकतात. म्हणून, कपडे नेहमी योग्य अंतरावर ठेवा आणि आवश्यक असल्यास, त्यांना थोडे थोडे पॅक करा.