आंतरराष्ट्रीयताज्या घडामोडी

चीनची भारताविरोधात जागतिक व्यापार संघटनेत (WTO) तक्रार दाखल

अमेरिकेने लावलेल्या टॅरिफनंतर भारत चीन पहिल्यांदा एका मंचावर

आंतरराष्ट्रीय : अमेरिकेने भारतासह चीनवर मोठा टॅरिफ लावला. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर टॅरिफ लावल्यानंतर चीन भारताच्या बाजूने मैदानात उतरला. हेच नाही तर भारत आणि चीनमध्ये यादरम्यान महत्वाचे करार झाले आणि भारतासाठी दुर्मिळ खनिज्यांवरील निर्बंध देखील उठवले. सध्या चीन आणि अमेरिकेत तणाव बघायला मिळतोय. अमेरिकेने चीनवर तब्बल 100 टक्के टॅरिफ लावला. हेच नाही तर पुढील काही दिवसांमध्ये रशियाकडून चीनने तेल खरेदी बंद केली नाही तर 500 टक्के अमेरिका चीनवर टॅरिफ लावण्याच्या तयारीत आहे. 100 टक्के टॅरिफ दुर्मिळ पृथ्वी खनिज्यांवरील निर्बंधांमुळे लावण्यात आला. आता चीन आणि अमेरिकेतील तणावात चीनने भारतावर गंभीर आरोप केला.

हेही वाचा : “पंतप्रधान मोदी डोनाल्ड ट्रम्प यांना घाबरतात”; राहुल गांधींची टीका

भारत इलेक्ट्रिक वाहन (EV) आणि बॅटरी उत्पादन वेगाने विकसित करत आहे. दिवसेंदिवस उत्पादन चांगलेच वाढत आहे. सरकारने या क्षेत्रातील देशांतर्गत उत्पादनाला चालना देण्यासाठी मोठी योजना सुरू केली. ज्यामुळे भारत जगातील सर्वात मोठ्या EV बाजारपेठांपैकी एक बनला आहे. तिथेच चीनची पोटदुखी उठली. भारताच्या वाढत्या यशावर चीनचा जळफळाट उठला असून चीन यावरून नाराज आहे.

हेच नाही तर चीनने थेट भारताविरोधात जागतिक व्यापार संघटनेत (WTO) तक्रार दाखल केली आहे. चीनचे म्हणणे आहे की, भारताच्या अनुदान योजना जागतिक व्यापार नियमांचे उल्लंघन करत आहे आणि त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. चीनला भारताने त्यांच्यासारखे धोरण थांबवावे वाटतंय. वेगाने विस्तारणाऱ्या भारतीय औद्योगिक धोरणाला धोका असल्याचेही चीनने म्हटले आहे.

भारतीय कंपन्यांना देशांतर्गत अधिक इलेक्ट्रिक वाहने आणि बॅटरी तयार करता याव्यात यासाठी अनुदान दिले जाते. मात्र, यामुळे चीनच्या कंपन्यांना फटका बसत आहे. भारत स्वत: चे इलेक्ट्रिक वाहने आणि बॅटरी तयार करत असल्याने चीनने धसका घेतला. भारताच्या सबसिडी नियमांच्या विरुद्ध आहेत, कारण त्यांच्यााकडून परदेशी कंपन्यांना समान संधी दिली जात नाही आणि स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन देऊन आयात कमी करण्याचा प्रयत्न करतात, असा थेट आरोप चीनने केला आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button