ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

महापौर रवि लांडगे यांचा स्वगणनेतून जनगणना २०२७ मोहिमेला शुभारंभ

पिंपरी | जनगणना २०२७ या महत्त्वाच्या राष्ट्रीय उपक्रमाची महाराष्ट्रात आजपासून सुरुवात झाली असून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे महापौर रवि लांडगे यांनी स्वतः ऑनलाइन स्वगणना पूर्ण करून या मोहिमेचा प्रारंभ केला. नागरिकांनीही पुढाकार घेत या प्रक्रियेत सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.

महापौर रवि लांडगे यांनी https://se.census.gov.in या संकेतस्थळावर भेट देत आवश्यक माहिती भरून स्वगणना प्रक्रिया पूर्ण केली. सर्व ३४ प्रश्नांची अचूक माहिती देत त्यांनी नोंदणी केली आणि ‘सेल्फ एन्युमरेशन आयडी’ प्राप्त केला. त्यांच्या या कृतीमुळे नागरिकांमध्ये सकारात्मक संदेश पोहोचला आहे.

हेही वाचा

खुशखबर! अपात्र लाडक्या बहि‍णींचे १५०० रुपये पुन्हा सुरु होणार…? शासनाकडून अपिलाची संधी?

यावेळी महापौर रवि लांडगे म्हणाले, जनगणना ही देशाच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यावश्यक आहे. अचूक माहितीमुळे शासनाला योग्य नियोजन करता येते. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने जबाबदारीने या उपक्रमात सहभागी व्हावे. १ मे ते १५ मे २०२७ या कालावधीत स्वगणना सुविधा उपलब्ध असून नागरिकांना घरबसल्या ही प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे.

याशिवाय, १६ मे ते १४ जून दरम्यान प्रगणकांमार्फत घरोघरी भेट देऊन उर्वरित जनगणना प्रक्रिया पार पडणार आहे. तरी अधिकाधिक नागरिकांनी स्वगणना करून सहकार्य करावे, असे आवाहन महापौर रवि लांडगे यांनी केले आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button