Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय

“पंतप्रधान मोदी डोनाल्ड ट्रम्प यांना घाबरतात”; राहुल गांधींची टीका

Rahul Gandhi | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियाकडून तेल खरेदी करणे बंद करणार असल्याचा शब्द दिला असल्याचा दावा डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकताच केला आहे. या दाव्यानंतर राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींना लक्ष्य केले. “पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना घाबरतात,” अशी तीव्र टीका लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केली आहे.

डोनाल्ड ट्रम्प काय म्हणाले ?

व्हाइट हाऊसमध्ये पत्रकारांशी बोलताना डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबाबत मोठा दावा केला. ते म्हणाले, रशियाकडून तेलाची आयात थांबवावी यासाठी मी पंतप्रधान मोदींना समजविण्याचा प्रयत्न केला. माझ्या मित्राने रशियाकडून तेलाची आयात थांबविण्याचा शब्द दिला आहे. यापुढे ते रशियाचे तेल विकत घेणार नाहीत. हा निर्णय काही आताच होणार नाही. याची एक प्रक्रिया आहे. पण ती लवकरच सुरू होईल.

हेही वाचा     :          सोलापूर-मुंबई विमानसेवेमुळे औद्योगिक विकासाला गती; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 

राहुल गांधी यांनी काय आरोप केला?

राहुल गांधी यांनी खालील कारणे दिली आहेत.

१. भारत रशियन तेल खरेदी करणार की नाही, हे ठरविण्याची आणि जाहीर करण्याची ट्रम्प यांना परवानगी दिणे.
२. ट्रम्प वारंवार अवहेलना करत असूनही त्यांना अभिनंदनाचे संदेश पाठवणे.
३. अर्थमंत्र्यांचा अमेरिकेचा दौरा रद्द करणे.
४. इजिप्तमधील शर्म-अल-शेखची बैठक टाळणे.
५. ऑपरेशन सिंदूरबाबत ट्रम्प यांनी केलेल्या दाव्याचे खंडन न करणे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button