Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध; उद्या होणार अधिकृत घोषणा

मुंबई | विधान परिषदेच्या द्विवार्षिक निवडणुकीतील सर्व जागा बिनविरोध झाल्या असून विजयी उमेदवारांची अधिकृत घोषणा सोमवारी करण्यात येणार आहे. उमेदवारी अर्जांच्या छाननीत प्रमुख राजकीय पक्षांच्या सर्व उमेदवारांचे अर्ज वैध ठरले, तर चार अपक्ष उमेदवारांचे अर्ज आवश्यक सूचक व अनुमोदक नसल्याने बाद ठरले.

या निवडणुकीत ९ जागांसाठी एकूण १७ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. काही राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी प्रत्येकी दोन अर्ज दाखल केले होते. शनिवारी झालेल्या छाननीत सर्व पक्षीय उमेदवारांचे अर्ज वैध ठरल्याने आणि अपक्ष उमेदवारांचे अर्ज बाद झाल्याने निवडणूक बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा झाला.

हेही वाचा

प. बंगालमध्ये 285 मतदान केंद्रांवर 21 मे रोजी होणार फेरमतदान, 24 मे रोजी निकाल; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय

दरम्यान, विधान परिषदेच्या एका जागेसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपच्या प्रज्ञा सातव यांचा अर्ज वैध ठरला आहे. या पोटनिवडणुकीसाठी दाखल करण्यात आलेला अपक्ष उमेदवाराचा अर्जही सूचक आणि अनुमोदकाच्या सह्या नसल्याने बाद ठरविण्यात आला. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत ४ मे आहे. मुदत संपल्यानंतर सर्व उमेदवार बिनविरोध निवडून आल्याची अधिकृत घोषणा करण्यात येईल.

अर्ज वैध ठरलेले उमेदवार

  • भाजप : सुनील कर्जतकर, माधवी नाईक, संजय भेंडे, विवेक कोल्हे आणि प्रमोद जठार
  • शिवसेना शिंदे गट : डॉ. नीलम गोऱ्हे, बच्चू कडू
  • राष्ट्रवादी अजित पवार गट : झिशान सिद्दिकी
  • शिवसेना ठाकरे गट : अंबादास दानवे

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button