Breaking-newsताज्या घडामोडीविदर्भ विभाग

केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या पेट्रोल पंपावर दरोडा

पंपावर बंदुकीचा धाक दाखवत लाखोंची रोकड लुटली

जळगाव : जळगावमध्ये मुक्ताईनगर इथं महामार्ग क्रमांक सहावर पेट्रोल पंप, दुकानांवर दरोडा टाकण्यात आल्याची माहिती समोर आलीय. यात केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मालकीच्या पेट्रोल पंपावरही दरोडा टाकण्यात आलाय. यात लाखो रुपयांची रोकड आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे साहित्य लुटून नेल्याची प्राथमिक माहिती समजते. दरोडेखोरांनी बंदुकीचा धाक दाखवत दरोडा टाकला. या प्रकरणी तिघांना ताब्यात घेण्यात आलंय.

हेही वाचा :  “शरद पवारांचे मानस पुत्र विजय कोलते यांनी अहिल्यांच्या जागा लाटल्या”; प्रा. लक्ष्मण हाके 

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, महामार्ग क्रमांक ६ वर केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांचा पेट्रोल पंप आहे. दरोडेखोरांनी पेट्रोल पंपावर बंदुकीचा धाक दाखवत लाखो रुपयांची रोकड लुटली. पाच दरोडेखोर असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यानंतर पोलिसांनी सिनेस्टाइल पाठलाग करत तीन दरोडेखोरांना ताब्यात घेतलं.

राज्य महामार्गा सहावरील तडवेल येथील पेट्रोल पंप, हॉटेल अनेक ठिकाणी सशस्त्र बंदुकीसह दरोडा पडल्याची माहिती समोर येत आहे. दरोडेखोरांनी मोटरसायकलवरून येत हा दरोडा टाकला आहे. यावेळी सीसीटीव्हीची तोडफोडही करण्यात आलीय. दरोडेखोरांकडून करण्यात आलेल्या तोडफोडीवेळी मारहाणी पेट्रोल पंपावरचा एक कर्मचारी जखमी झालाय. दरोड्याच्या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button