ज्योतिषशास्त्रात जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकीतं केली जातात. दैनंदिन राशीभविष्य हे रोजच्या घडामोडींचे अंदाज देते. तुमचा आजचा दिवस कसा जाईल ? काय घडणार आजच्या दिवसात ? हे जाणून घेण्यासाठी अवश्य वाचा आजचे राशीभविष्य
मेष : व्यवसायाची उलाढाल वाढेल. आर्थिक निर्णय मार्गी लागतील.
वृषभ : दैनंदिन कामे मार्गी लागतील. मन आनंदी व आशावादी राहील.
मिथुन : हितशत्रुंवर मात कराल. खर्चाचे प्रमाण वाढेल.
कर्क : महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.
सिंह : राजकीय व सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. तुमच्या कर्तृत्त्वाला संधी लाभेल.
कन्या : मनोबल व आत्मविश्वास वाढेल. आरोग्य उत्तम राहील.
हेही वाचा : “शरद पवारांचे मानस पुत्र विजय कोलते यांनी अहिल्यांच्या जागा लाटल्या”; प्रा. लक्ष्मण हाके
तुळ : महत्त्वाची कामे शक्यतो पुढे ढकलावीत. वादविवाद टाळावेत.
वृश्चिक : जोडीदाराचा सल्ला लाभदायक ठरेल. भागीदारी व्यवसायात सुयश लाभेल.
धनु : शत्रुपिडा नाही. काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.
मकर : आर्थिक निर्णय मार्गी लागतील. नवी दिशा, मार्ग सापडेल.
कुंभ : प्रॉपर्टी व गुंतवणुकीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. प्रवास सुखकर होईल.
मीन : जिद्द व चिकाटी वाढेल. नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील.




