TOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई

राजगड किल्ल्यावर फिरण्यासाठी गेलेल्या पर्यटकांवर अचानक मधमाश्यांचा हल्ला

मधमाश्यांच्या हल्ल्यामुळे तरुणी 40 फूट खोल दरीत कोसळून जखमी

पुणे : पुणे जिल्ह्यातील ऐतिहासिक आणि पर्यटनदृष्ट्या महत्त्वपूर्ण राजगड किल्ल्यावर अनेक जण फिरण्यासाठी जात असतात. मात्र याच राजगडावर एक भयंकर घटना घडली आहे. राजगड किल्ल्यावर फिरण्यासाठी गेलेल्या पर्यटकांवर, अचानक मधमाश्यांनी हल्ला केला. मधमाशांच्या हल्ल्यापासून बचावाचा प्रयत्न करत असताना एक तरुणी सोबत गंभीर अपघात घडला. किल्ल्यावरील संजीवनी माची परिसरात भ्रमंतीसाठी आलेल्या अंजली पाटील (वय 24 वर्षे) या युवतीवर अचानक मधमाश्यांचा हल्ला झाला. घाबरल्यामुळे त्यापासून बचावाच्या प्रयत्नात असताना संतुलन गमावून अंजली ही सुमारे 40 फूट खोल दरीत ती कोसळली.

यामुळे तिच्या मणक्यामध्ये (पाठीच्या कण्यामध्ये) फ्रॅक्चर झाल्यामुळे तिला स्वतःला बिलकूल हालचाल करता येत नव्हती. अखेर तिला वाचवण्यासाठी वेल्हे पोलीस स्टेशनमार्फत वेल्हा-हवेली आपत्ती व्यवस्थापन रेस्क्यू टीम पर्यंत पोहोचवण्यात आली.

हेही वाचा :  “शरद पवारांचे मानस पुत्र विजय कोलते यांनी अहिल्यांच्या जागा लाटल्या”; प्रा. लक्ष्मण हाके 

अंधारात आव्हानात्मक रेस्क्यू ऑपरेशन

या घटनेची माहिती मिळताच रेस्क्यू टीमने तत्काळ बचाव मोहिम सुरू केली. किल्ल्याचा परिसर अत्यंत दुर्गम, उतारदार आणि अंधाराने भरलेला असल्यामुळे रेस्क्यू मोहिम आव्हानात्मक ठरली. रात्रीच्या काळोखात, निसरडा उतार आणि अडचणीच्या पायवाटींवरून हे रेस्क्यू करण्यात आलं. अखेर तिला सुखरूप वाचवण्यात आलं.

यांसदर्भात वेल्हा-हवेली आपत्ती व्यवस्थापन संघाचे अध्यक्ष तानाजी भोसले म्हणाले, “कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत आपातग्रस्तांना त्वरित मदत मिळणे आमचा प्राथमिक उद्देश आहे. स्थानिक प्रशासनासोबत समन्वय साधून आणि तांत्रिक कौशल्य वापरून आम्ही प्रत्येक रेस्क्यू यशस्वी करण्याचा प्रयत्न करतो.” त्यानुसार अखेर 8-9 तासांच्या अथक प्रयत्नांनंतर अंजली पाटील हिला स्ट्रेचरच्या साहाय्याने सुरक्षितरीत्या किल्ल्याच्या पायथ्याशी आणण्यात यश मिळाले. त्यानंतर तिला वेल्हे प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. पाटील यांच्या स्वाधीन करून प्राथमिक उपचार दिले गेले. पुढील उपचारासाठी तिला पुणे येथील रुग्णालयात हलवण्यात आले. सुदैवाने आता तिची प्रकृती स्थिर आहे..

या धाडसी रेस्क्यू मोहिमेत वेल्हा-हवेली आपत्ती व्यवस्थापन रेस्क्यू टीमचे सदस्य सहभागी होते. तानाजी भोसले, वैभव भोसले, मनोज शिंदे, आकाश झोंबाडे, संजय चोरघे, संतोष जाधव, उत्तम पिसाळ, विक्रम बिरामणे आणि अनिल रेणुसे या सर्व सदस्यांनी एकजूट आणि धैर्य दाखवत, सुरक्षित बचाव सुनिश्चित केला. संगठित बचाव कार्य आणि तत्पर आपत्ती व्यवस्थापन संघ हा नागरिकांचा जीव वाचवण्यासाठी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतो हे या घटनेतून पुन्हा एकदा सिद्ध झालं.

सावध रहा, नियम पाळा

बचाव पथकाकडून ट्रेकिंग करण्याऱ्यांसाठी काही सावधगिरीचे निर्देश देण्यात आलेत.

– ट्रेक करताना योग्य पादत्राणे, पाणी आणि प्राथमिक उपचार साहित्य सोबत ठेवावे.

– मधमाश्या, साप किंवा अन्य वन्यजीव दिसल्यास घाबरून न जाता शांत राहून सुरक्षित ठिकाणी जावे.

– अपघात किंवा इतर आपत्कालीन परिस्थितीत त्वरित वेल्हा-हवेली आपत्ती व्यवस्थापन टीमशी संपर्क साधावा.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button