आंतरराष्ट्रीयताज्या घडामोडी

आता! बिगबास्केटची बारी,10 मिनिटांत सामान घरपोच…

बिगबास्केट बाह्य गुंतवणूकदारांकडून निधी उभारण्याची योजना

मुंबई : भारतात कोणताही किराणा असो वा इतर जुजबी सामान अवघ्या दहा मिनिटांत घरपोच मिळत आहे. फूड एपवरुन तर हवे ते खाद्यपदार्थ लिलया मिळत आहेत. भारतात क्वीक कॉमर्सचा बाजार खूपच वेगाने वाढत आहे. या मार्केटमध्ये अनेक कंपन्याची एकमेकांत स्पर्धा सुरु झाली आहे. आता क्वीक मार्केटमध्ये टाटा ग्रुपची कंपनी बिगबास्केटने देखील मोठी झेप घ्यायचे ठरवले आहे. कंपनीचे सहसंस्थापक विपुल पारेख यांनी सांगितले की बिगबास्केट २०२६ च्या आर्थिक वर्षअखेर संपूर्ण देशात १० मिनिटात फूड डिलिव्हरी सेवा सुरु करणार आहे. काय आहे कंपनीची योजना पाहूयात…

भारतात घर बसल्या दिवाणखान्यात लोकांना गरमागरम खाद्यपदार्थ क्रिकेटची मॅच पाहाताना खायला मिळत आहेत. या मार्केटमध्ये आधीच अनेक कंपन्या आहेत. क्वीक कॉमर्स मार्केटमध्ये स्विगी स्नॅक, ब्लिंकिट बिस्ट्रो आणि झेप्टो कॅफे सारख्या कंपन्याची स्पर्धा असतानाही आता टाटा ग्रुपची बिग बास्केट कंपनी दहा मिनिटात जेवण पोहचवणार आहेत. ७१०० कोटी रुपयांचा क्विक कॉमर्स बाजारात आता बिग बास्केट देखील उतरली आहे.

बिगबास्केटचे टार्गेट झोमॅटो आणि स्विगी सारख्या दादा फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्मचे ग्राहकांना त्यांच्याकडे आकर्षित करण्याचे आहे. विपुल पारेख यांनी सांगितले की कंपनी या सेवेद्वारे डार्क स्टोअरचा वापर करणार आहे. डार्क स्टोअर हे छोट्या गोदामासारखे असतात. जे जास्त लोकसंख्या असलेल्या जागी असतात. येथे डिलिव्हरी पार्टनर, टु-व्हीलर रायडर्स, सामान वा फूड ग्राहकांपर्यंत पोहचवत असतात.

हेही वाचा   :    Mission PCMC : महापालिका निवडणुकीत खरी लढत भाजपा अन्‌ राष्ट्रवादीतच!

डार्क स्टोअर्सचा विस्तार
बिगबास्केटने 2011 मध्ये भारतात ऑनलाईन किराना डिलीव्हरी सुरू केली होती,सध्या ही कंपनी 700 डार्क स्टोअर्सना चालवते. कंपनीने साल 2025 च्या अखेरपर्यंत या डार्क स्टोअरची संख्या वाढवून 1000 ते 1200 करण्याची योजना आखली आहे. या नवीन फूड डिलीव्हरी सेवेची सुरुवात गेल्या महिन्यात बंगळुरुत पायलट प्रोजक्ट अंतर्गत झाली होती. आता कंपनी जुलै 2025 पर्यंत 40 डार्क स्टोअरद्वारे नव्या संकल्पनेचा विस्तार करणार आहे. पारेख यांनी सांगितले की सध्या 5-10 टक्के ग्राहक नेहमीच्या किराणा खरेदीसह रेडी टू इट खाद्य पदार्थ ऑर्डर करीत आगे. हा आकडा लवकरच वाढण्याची शक्यता आहे.

आयपीओ आणणार
बिगबास्केट पुढील 18-24 महिन्यांत शेअर बाजारात सूचीबद्ध होण्याची तयारी करीत आहे. बिगबास्केटच्या या सेवेमध्ये स्टारबक्स कॉफी आणि टाटा समूहाच्या इंडियन हॉटेल्सची फूड कंपनी क्यूमिनची उत्पादने समाविष्ट असतील. कंपनीने स्पष्ट केले की ती कोणत्याही बाह्य रेस्टॉरंटशी भागीदारी केली जाणार नाही.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button