Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीराष्ट्रिय

मोठी दुर्घटना! आसाममध्ये भारतीय वायू दलाचे ‘एएन-३२’ विमान कोसळले

Indian Air Force Plane Crash |भारतीय वायू दलाचे एएन-३२ हे विमान आसाममधील जोरहाट येथे दुर्घटनाग्रस्त झाले आहे. शनिवारी सकाळी हे विमान जोरहाट येथील लष्करी तळावर लँड झाल्यानंतर त्याला आग लागली. प्राथमिक अहवालानुसार, आग लागण्याआधीच विमान लँड झाले होते. विमानाला आग लागल्यानंतर एअरबेसमधील आपात्कालीन सुविधा पुरवणाऱ्या यंत्रणांनी विमानाच्या दिशेने धाव घेतली.

विमान दुर्घटनाग्रस्त का झाले? या अपघातात जीवितहानी झाली आहे का? किती नुकसान झाले याबाबत अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. विमानाला आग का लागली याचा तपास यंत्रणा शोध घेतली. दरम्यान, घटनास्थळी अधिकारी पोहोचत असून परिस्थिती जाणून घेतल्यानंतर ते या दुर्घटनेबाबत अधिक माहिती देतील.

बातमी अपडेट होत आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा 

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button