Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराष्ट्रिय

Ahmedabad Plane Crash : विमान अपघातात महाराष्ट्राच्या ६ जणांचा मृत्यू

Ahmedabad Plane Crash : गुजरातमधील अहमदाबाद येथे एअर इंडियाचे बोइंग 787-8 विमान कोसळून अपघात झाला आहे. या प्रवाशी विमानात एकूण 242 प्रवासी होते, ज्यामध्ये अनेक परदेशी प्रवाशांचादेखील समावेश होता. परंतु टेकऑफनंतर काही मिनटांतच हे विमान कोसळले. या दुर्घटनेत २०० हून अधिक जणांचा मृत्यू झाला असून यामध्ये काही प्रवासी महाराष्ट्रातील असल्याची माहिती समोर आली आहे.

अर इंडियाच्या या विमानात असलेल्या १२ केबिन क्रू मेंबर्सपैकी ३ कर्मचारी महाराष्ट्राचे तर तीन जण प्रवासी असे एकूण ६ जण असल्याची माहिती समोर आली आहे. अपर्णा महाडिक, मैथिली पाटील आणि रोशनी राजेंद्र सोनघरे या तीन महिला अहमदाबादहून लंडनला जाणाऱ्या एअर इंडियाच्या या विमानात होत्या. यासोबतच, महादेव पवार, आशा पवार आणि मयुर पाटील हे तीनजणही या विमानात प्रवास करत होते.

हेही वाचा –  Ahmedabad Plane Crash | २४२ प्रवाशांना घेऊन जाणारं एअर इंडियाचं विमान अहमदाबादमध्ये कोसळलं

मिळालेल्या माहितीनुसार,  या विमानात असलेल्या २४२ प्रवाशांपैकी १६९ प्रवासी हे भारतीय होते, तर ५३ ब्रिटीश नागरिक, ७ पोर्तुगिज आणि १ कॅनडाचा नागरिक होता. यापैकी अपर्णा महाडिक या राष्ट्रवादीचे नेते सुनिल तटकरे यांच्या नात्यातील आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, अपर्णा महाडिक या सुनील तटकरेंचे भाचे अमोल यांच्या पत्नी होत्या. अमोल देखील स्वतः एअर इंडिया मध्ये पायलट आहेत. या अपघाताची माहिती मिळताच खासदार सुनील तटकरे माजी आमदार अनिकेत तटकरे, महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे हे  आपल्या वहिनी राहत असलेल्या मुंबई गोरेगाव ईस्ट  येथील निवासस्थानी पोहोचले असल्याची प्राथमिक माहिती समोर आलेली आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button