महिला पोलिस अधिकारी, महिला लोकप्रतिनिधी व एकल महिला यांच्या हस्ते वडाचे वृक्षारोपण
वटपौर्णिमेनिमित्त वडाचे वृक्षारोपण करत "कृष्णाली फाऊंडेशनने" घातला नवा पायंडा

आहिल्यानगर | वटपौर्णिमा सणाचे औचित्य साधत कृष्णाली फाऊंडेशनच्या वतीने एक आगळावेगळा उपक्रम राबवण्यात आला, वड या कल्पवृक्षाचं अत्यंत महत्त्व आहे, धार्मिक कार्यात वडाला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे, आता देशी झाडांचे प्रमाण कमी होत आहे, वडाच्या झाडापासून सगळ्यात मोठा ऑक्सिजनचा पुरवठा केला जातो, वटपौर्णिमेला सुवासिनी महिला या वडाच्या झाडाकडे आपल्या सौभाग्यासाठी दीर्घायुष्य मागत असतात म्हणून आज महिलांच्या हाताने वडाचे झाड लावण्याचा उपक्रम कृष्णाली फाऊंडेशन’ने हाती घेतला.
वटपौर्णिमा हा सुवासिनीचा सन मानला जातो परंतु कृष्णाली फाऊंडेशन या ठिकाणी एकल महिलांना मान सन्मान दिला आणि त्यांच्या हाताने देखील वडाचे झाड या ठिकाणी रोपण केल, या सामाजिक कार्यक्रमात जनतेचे रक्षण करणाऱ्या पोलीस दलातील महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांनी देखील मोठ्या उत्साहाने यामध्ये सहभाग नोंदवला.
हेही वाचा : पत्रकार सुनील लांडगे यांना “भागवत धर्म प्रसारक पुरस्कार” जाहीर
तसेच आपल्या भागात उपक्रम होत असताना स्थानिक महिला लोकप्रतिनिधी यांनी देखील आवर्जून उपस्थित दर्शविली. बहुगुणी असणाऱ्या वडाच्या वृक्षारोपणाने नवं ऊर्जा आणि नवं चेतना मिळाली. या कार्यक्रमासाठी कृष्णाली फाऊंडेशनचे अध्यक्ष प्रशांत पाटील शेळके, मा. महापौर रोहिणीताई शेडगे, PSI शितल मुंगडे, पत्रकार प्रियंका पाटील शेळके, हेड कॉन्स्टेबल वैशाली पठाडे, पोलीस नाईक योगिता साळवे, कॉन्स्टेबल सोनाली भागवत आणि मा. नगरसेविका वैशाली नळकांडे , मा. नगरसेविका सविता शिंदे, जयश्री देवतरसे गणेशनगर सोसायटी उपाध्यक्ष गायत्री सतीश बागडे, आशा शेळके, ताराबाई शिंदे, साधना गरड, शुभांगी भगने, भारती कोमकुल, जयश्री सोनवणे, सुवर्णा इरोळे, ज्योती रासकर, कामिनी बोराडे आणि परिसरातील महिला वर्ग उपस्थित होत्या. या प्रसंगी मान्यवरांचा गुलाबाचे रोप देऊन सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी बालाजी फाउंडेशनचे विशेष सहकार्य लाभले, यावेळी अध्यक्ष मेजर शिवाजी पठाडे, राज ठाणगे, गणेश शिंदे गणेशनगर सोसायटी चेअरमन उपस्थित होते.